नांदेड| नांदेड रेल्वे स्टेशनचे सेवानिवृत्त अधिक्षक दंगलराव मोरे वय (88 )वर्षे यांचे आज शुक्रवारी सकाळी 10. 30 वाजता अल्प आजाराने निधन झाले आहे.
आयुष्यामान मोरे यांनी खंडवा,वसमत,आकोला, हिंगोली,वाशीम, पुर्णा,भंडारा, आमनवाडी,येथे सेवा बजावली.एक कर्तव्य दक्ष,शिस्तप्रिय ,मनमिळावू वृतीचे आधिकारी म्हणून त्यांचे नांव लौकीक होते. त्याचाच काळात मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे देखील सुरु झाली. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 1 जुलै रोजी गोवर्धन घाट येथे आत्यंसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले,4 मुली,सुना, जावई,नातवंडे, आसा मोठा परिवार आहे. ते हषीँता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनिल मोरे यांचे वडील होत.