जाहुर सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील बोडके,व्हाईस चेअरमनपदी गोविंद पाटील हिवराळे बिनविरोध -NNL


मुखेड।
मुखेड तालुक्यातील जाहुर येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध पार पाडण्यात आली निवडीनंतर सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने चेअरमनपदी  शिवाजी शाहुजी पाटील बोडके तर व्हाईस चेअरमनपदी गोविंद पाटील हिवराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जाहुर सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक  शिवाजी शाहुजी पाटील बोडके यांच्या नेतृत्वाखाली  बिनविरोध काढण्यात आली. चेअरमन पदाची निवडीसाठी सर्व बिनविरोध निवड झालेल्या सभासदाची बैठक जाहुर येथील ग्रामंपंचायत कार्यालयात दि.1 जुलै शुक्रवार रोजी घेण्यात आली.या बैठकीत सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने एकमताने शिवाजी शाहुजी पाटील बोडके यांची सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नवनिर्वाचीत चेअरमन,व्हाईस चेअरमन सभासद यांचा गावकर्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .चेअरमन शिवाजी पाटील बोडके यांच्या समवेत सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी एम.डी.राठोड,हंणमत बोडके,गोविंद हिवराळे,प्रकाश हिवराळे,दशरथ हिवराळे,शरद डुब्बेवाड,विठ्ठल बोडके,नामदेव हिवराळे,बालाजी चिकटवाड,शफी शेख,सुमिञाबाई हिवराळे,गंगाबाई बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी युवक काॅग्रेसच्या आजी तालुकाअध्यक्ष किरण पाटील बोडके,यादवराव हिवराळे गुरुजी,डाॅ मोहन हिवराळे, भगवान सुरनर,गोपाळ हिवराळे,कृष्णा भिंगोले आदीजण उपस्थित होते.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ए.एम.राठोड व गटसचीव पी.एस.पिंजारी यांनी काम पाहीले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी