उस्माननगर येथे संततधार पाऊस थंड गारव्याने काकडून पंचेचाळीस मेढ्यांचा मृत्यू -NNL

लाखो रुपयांचे नुकसान


उस्माननगर, माणिक भिसे|
उस्माननगर येथे मागील एक आठवड्यापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे व थंड सुटलेल्या ( वारा) गारव्यामुळे येथील माळरानावरील चाळीस ते पंचेचाळीस मेढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

उस्माननगर येथील शेरूमीयाॅ फकिरसाब आदमनकर व मेढ्या रखवालदार यांच्या मेढ्या नेहमी प्रमाणे माळरानावर चारुन एका ठिकाणी बसलेल्या होत्या. मागील आठवड्यात परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गार सुटलेल्या हावेने चाळीस ते पंचेचाळीस मेढ्या झिमझिम व रिपरिप पडलेल्या पावसात मेढ्या सैरावैर धावू लागल्या. आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात मेढ्याचा थंडीमुळे तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

याची महीती तात्काळ महसूल विभागाला देवून तलाठी,व अन्य अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. असून निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे लाखों रुपयाची नुकसान झाले आहे. तरी संबंधित प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष वेधून झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी