विलासराव चव्हाण उंचाडकर (जिल्हा उपाध्यक्ष सरपंच संघटना नांदेड)तसेच उंचाडा गावचे उपसरपंच दिनकर बापूराव चव्हाण
उंचाडा/हदगाव। तालुक्यात मागील पाचसहा दिवसापासून अतिवृष्टी होत असल्याने शेकडो हेक्टरवरील खरीपाची पिके हातची गेली असुन शेतकऱ्यांचे यामुळे अतोई नुकसान झाले आहे. तातडीने उंचाडा बरोबर सरसगट पंचनामे पाहणी करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याची मागणी उंचाडा ग्रामपंचायतचे सरपंच व दिनकर बापूराव चव्हान उपसरपंच, काँग्रेसची युवा नेते विलासराव चव्हाण उंचाडकर जिल्हा उपाध्यक्ष सरपंच संघटना नांदेड यांनी केली आहे.
हदगाव तालुक्यातील कयाधू नदीबरोबर विविध शिवारातील नदिनाले औढे यांना पुर येऊन पुराने नदिनाले काठच्या शेतीच नुकसान झाले. शेतजमीन खरडून गेली कयाधु काठच्या शेकडो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले.सततच्या पावसाने पिके पाण्याखाली येऊन नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीची पाहणी पंचनामे करुन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याची मागणी विलासराव चव्हाण उंचाडकर जिल्हा उपाध्यक्ष सरपंच संघटना नांदेड व उंचाडा ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच दिनकर बापूराव चव्हाण, उंचाडकर अनेकांनी केली आहे.