नांदेड| जिल्हाभरात गेल्या आठवडा भरापासून पावसाची संतधार सुरूच आहे.सततच्या पावसामुळे सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली.त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्याकाठच्या जमिनीत पाणीच पाणी साचले आहे.पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांना देण्यात आले
नांदेड जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी बँक पीक कर्ज वेळेवर देत नसल्यामुळे खाजगी सावकारांकडून कर्ज काढून शेतात पेरणी केली होती.ती पेरणी केलेल्या शेतातील पीक या पावसामुळे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे कुठलेही पंचनामे न करता तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील प्रदीप गुबरे,परमेश्वर पाटील,कमलेश कदम,शिवाजी हंबर्डे,सतीश धुमाळ,अंकुश कोल्हे,अशोक कदम,सारंग मिराशे,राहुल झडते , संतोष असर्जनकर, विजय भारमावडे, मारुती क्षिरसागर, सदाशिव नवले यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.