नविन नांदेड| रमजान ईद निमित्ताने अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको येथील खुबा मस्जिद येथे रमजान ईद निमित्ताने नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांना गुलाब पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
दरवर्षी प्रमाणे याही रमजान ईद निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तथा अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ यांच्ये संस्थापक अध्यक्ष अवतार सिंघ सोडी, नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर,राजु टमाना, छायाचित्रकार सांरग नेरलकर, सचिन सोनटक्के यांनी मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जोपासली.
गेल्या अनेक वर्षांपासून अवतार सिंग सोडी मित्र मंडळ यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत हा ऊपकम आयोजित करण्यात येत आहे,या ऊपकमाचे मुस्लिम समाज बांधवांनी स्वागत करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी मौलाना,जेष्ठ मुस्लिम समाज बांधव यांच्या सह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.