नविन नांदेड| रमजान ईद निमित्ताने धनेगाव मुजामपेठ येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण केले तर सिडको येथील खुबा मस्जिद मध्ये सामुहिक नमाज अदा करण्यात आली या यावेळी समाज बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद निमित्ताने ३ एप्रिल रोजी सिडको हडको सह धनेगाव मुजामपेठ सह वसरणी, व परिसरातील रहिमपुर नविन मुजामपेठ येथील समाज बांधव हे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी रमजान ईद निमित्ताने नमाज पठण अदा करण्यासाठी येत असतात, यावेळी ग्रामपंचायत सदस्य गफुर साब, फारूख भाई, मस्जिद कमिटी अध्यक्ष खालेद ,कौसर, जिकीर,याशु एजाज शेख,पाशा भाई,शेख मोईन लाठकर, शेख मुख्तार व समाज बांधव यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सिडको येथील खुबा मस्जिद येथे सामुहिक नमाज पठण अदा केली या वेळी गुलाब रसुल चुडीवाले, हाबु मियां, अहात खान पठाण, शेख सर यांच्या सह प्रतिष्ठीत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कोरे व कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.