नायगाव येथे परशुराम जयंती निमित्त ४२ लघु व्यवसायिकांना छत्री तर नर्सित थंड पाणी वाटप
नायगाव,दिगंबर मुदखेडे| ब्राह्मण समाज बांधवांनी परशुराम जन्मोस्तव साजरा करताना इतर समाजातील वंचित घटकांचा सन्मान करून त्यांच्या व्यवसायला उभारी देण्यासाठी मायेची सावली अंतर्गत लघु व्यवसायिकांना छत्री वाटप करून एक स्तुत्य उपक्रमाची परंपरा चालू ठेवली. याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे प्रतिपादन अभिषेक शिंदे साहेब पो.नि.पोलीस ठाणे नायगाव यांनी केले.
आ.भा. ब्राम्हाण महासंघ तालुका शाखा नायगाव च्या वतीने मंगळवार दि. 3 में 2022 अक्षय तृतीया रोजी श्री भगवान परशुराम जयंती उत्सव निमित्त सकाळी 8.00 वा.हनुमान मंदिर नांदेड रोड येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्या निमित्त कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावर्षी नायगाव ब्राह्मण महासंघाच्या वतीने रस्त्याच्या व चौरस्त्याच्या कडेला (बाजुला ) बसलेल्या लघु व्यावसाईकांना उन्हा पासुन व पावसा पासुन रक्षण व्हावे म्हणुन "मायेची सावली" ४२ व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यातआले व नरसी चौकात दिवसभर थंड पाणी वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाळासाहेब पांडे मांजरमकर जिल्हाध्यक्ष आ.भा.ब्राह्मणमहासंघ नांदेड हे होते… विशेष अतिथी म्हणून.महादेव पुरी साहेब सपोनि पोलीस ठाणे कुंटुर,उमाकांतराव देशपांडे उपसरपंच नावंदी,.सुधीर कुलकर्णी ट्रेजरी ऑफिसर नायगाव .वे शा.सं.उत्तम महाराज नायगावकर ग्राम जोशी नायगाव*प्रदीप आंबदासराव कुलकर्णी*से. नि. मुख्यध्यापक, पाठक साहेब कोर्ट नायगाव ,ऍड निलेश देशपांडे नावंदीकर.भा.ग.मोरे जेष्ठ नागरिक संघ ता अध्यक्ष तथा ब्राह्ममित्र नायगाव, माधव मामा कोकुरले माजी.ता अध्यक्ष पत्रकार संघ नायगाव, नागेश पा.कल्याण ता अध्यक्ष मराठी पत्रकार संघ नायगाव, राजेश कुलकर्णी ता अध्यक्ष उमरी ,मनोज महाराज नरसी ,राजेश कांबळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रारंभी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या नंतर उपस्थित लघुव्यवसायिक यांचा मोठी स्टँड सह छत्री व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला तर काहींचा त्यांच्या जाग्यावर जाऊन सन्मान करण्यात आला. सपोनि महादेव पुरी, उमाकांत देशपांडे, भा.ग.मोरे, राजेश कांबळे यांनी आपले मनोगत मांडताना या स्तुत्य उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.शेवटी बाळासाहेब पांडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना नायगाव ब्राह्मण महासंघ म्हणजे वैचारिक अधिष्ठाण ठेऊन उपक्रम राबवणारे विद्यापीठच असल्याचे बोलून दाखवले.
कार्यक्रम यशस्विते साठी आ.भा.ब्राह्मण महासंघ जिल्हा युवा अध्यक्ष प्रज्योत कुलकर्णी, ता.अध्यक्ष गंगाप्रसाद कुलकर्णी,सुधीर जोशी,विषु जोशी,,रोहन जोशी,उमेश नायगावकर,मंदार कुलकर्णी,नायगाव मनोज महाराज जोशी,संदीप जोशी राजू कुलकर्णी शंकर मेहता,अर्जुन मेहता,प्रदीप जोशी,जितेंद्र जोशी,मोहन मेहता, यासह सर्व पदाधिकारीआ.भा ब्राम्हण महासंघ तालुका शाखा नायगाव व नरसी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचलन मंगेश देशपांडे यांनी केले तर आभार श्याम कुलकर्णी यांनी मानले.