नविन नांदेड। राहेगाव ता.जि.नांदेड येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ ४ मे पासुन तर श्री रूद्र स्वाहाकर यज्ञ ६ ते १० हे पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
वै. आचार्य प्रणव महाराज धानोरकर,मंहत परमपूज्य समगिर महाराज नांदगावकर यांच्या कृपेने रूद्र स्वाहाकर यज्ञ होणार असुन श्रीमद भागवत कथा प.पु. अंनत महाराज बेलगावकर यांच्या सुमधुर वाणीतुन ४ ते ९ हे पर्यंत दुपारी १ ते ४ या वेळेत होणार आहे.
दैनंदिन कार्यक्रम मध्ये काकाडा आरती, शिवलीलामृत पारायण, रूद्र स्वाहाकर यज्ञ,भागवत कथा ज्ञान यज्ञ व महाप्रसाद,हारिपाठ,हारि किर्तन,व जागरण कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे, ४ मे रोजी हभप भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर,५ मे रोजी हभप माणिक महाराज रेगे परभणी,६ रोजी योगेश महाराज गंवडगावकर,७ हे रोजी ज्ञानेशवर महाराज शिंदगीकर,८ मे रोजी नवनाथ महाराज डोगरशेलकीकर,९ मे रोजी ज्ञानोबा महाराज मुडेकर १० मे रोजी विशाल महाराज कोल्हे आंळदीकर ,११ हे रोजी नामदेव महाराज लबडे पंढरपूर यांचे किर्तन होणार असुन १० मे रोजी भागवत कथा सांगता ९ वाजता होणार आहे.
भागवत कथा व रूद्र स्वाहाकर यज्ञ यांच्या भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन गावकरी मंडळी व संयोजन समिती ने केले आहे.