मुंबई। आज सर्वोच्च न्यायालयाने राजकीय आरक्षणाबद्दल निर्णय दिला . 15 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले . सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारला चपराक असल्याची टीका आता होत आहे .
भाजपा आमदार डॉ संजय कुटे यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून राज्य सरकारला धारेवर धरले . महाराष्ट्रातील ओबीसीचा घात जाणून बुजून महाविकास आघाडी सरकारने केल्याचं डॉ संजय कुटे म्हणाले .दोन वर्षापासून आम्ही सांगत होतो तरीही राज्य सरकारने इंपेरिकल डाटा दिला नाही . न्यायालयाने सांगितले.
ओबीसीनी आंदोलन केली . पण महाविकास आघाडीने हेतु पुरस्सरपणे याकडे दुर्लक्ष केले असा आरोप संजय कुटे यांनी केला . ओबीसीवर हा अन्याय आहे . महाराष्ट्रातुन ओबीसी नेतृत्व पुढे येऊ नये , ओबीसी नेतृत्व संपाव हे यांच्या मनात होत . राज्य सरकारचा आपण निषेध करत असून ओबीसी समाजातील संताप आता सरकारला दिसणार असल्याचे संजय कुटे म्हणाले.