हिंदू - मुस्लिमात द्वेष निर्माण करून फायदा घेण्यासाठी भाजपची खेळी
हिमायतनगर, अनिल मादसवार| काल पुणे येथे घडलेल्या घटनेबाबत पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता हिंगोलीचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे म्हणाले कि, पाकिस्थान जिंदाबाद म्हणून हिंदू -मुस्लिम दोन समाजात दंगल घडून महाराष्ट्राचे वातावरण बिघडऊन आम्हीच हिंदुत्ववादी अहो हे दाखविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे हे षडयंत्र आहे. महाराष्ट्रात भाजप रसातळाला घेलेली आहे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची लोकप्रियता पाहता भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. म्हणून हिंदू - मुस्लिमात द्वेष निर्माण व्हावा आणि आम्हीच हिंदूतावादी अहो हे दाखविण्यासाठी भाजपनं हे घडून आणलं असा गंभीर आरोप हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी केला.
ते हिमायतनगर येथे आज दि.२५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आले असता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत हादगावचे माजी आमदार तथा शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, जेष्ठ कार्यकर्ते बळीराम देवकते, सत्यव्रत ढोले, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, राजेश जाधव, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, संजय काईतवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी शिवसेनेचा होतो शिवसेनेचाच आहे. त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव साहेबानी माझ्यावर हि जवाबदारी टाकली आहे. आगामी काळात हिंगोली, नांदेड लोकसभा व सर्व विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा भगवा फडकविण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्याना भेटून एकजूट करून पुन्हा महाराष्ट्रावर भगवा फडकविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कार्यकर्त्यांनी देखील इतर कोणाच्याही नादाला लागून आपलं नुकसान करून घेऊ नये, केवळ शिवसना हाच एकमेव पक्ष आहे कि, जो काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करून त्याला मोठ्या पदावर नेतो. शिवसेनेचा खरा कार्यकर्ता पुढेपुढे करत नाही, आपल्या भाग, परिसर आणि आपल्या गावच्या विकासासाठी आणि पक्षाचे महत्व पटून देत बूथ मजबूत करण्याचे काम करतो. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला सारून कामाला लागावं. आपापलं गावं सांभाळून पक्ष संघटना वाढऊन माननीय उध्वव साहेबांचे हात बळकट करावे. आजी माजी नाराज अपक्ष व सर्वांना भेटून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सर्वानी मिळून करू. तसेच दसऱ्यांनतर हिमायतनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मेळावा घेऊ आणि पक्ष कार्यकर्त्यावर जबाबदारी टाकू. मला काही विधानसभा निवडणूक लढवायची नाही. नागेश पाटील आष्टीकर आणि मी .. आम्ही दोघे एक आहोत कुणीही आमच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करू नये... असं कोणी करत असले तो माझ्या नजरेत आला तर त्याची खैर नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांनी इतर लोकांच्या भूलथापांना बळी नं पडता शिवसेना धनुष्यबाण लक्ष ठेवून जनसंपर्क करा. मताधिक्य कसं वाढलं यावर लक्ष केंद्रित केलं तरच पक्ष मजबूत होईल... त्यासाठी जनतेला आपल्या पक्षाचं महत्व समजून सांगा असे आवाहन सुभाष वानखेडे यांनी केले.
आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवं फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट व्हावं - मा. आ. नागेश पाटील आष्टीकर
आत्ताची परिस्थिती बदलली आहे, या परिस्थितीत फायदा घेऊन शिवसेना कशी मजबुत होईल आणि पुन्हा भगवा फडकावून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला आपल्या ताब्यात कसा घेता येतील यासाठी सर्वानी प्रयत्न करायला हवे. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडणून आणून तालुक्यातील मतदार संघाचा शाश्वत विकास करण्यासाठी प्रयत्न करू. आपल्याकडे येणाऱ्या सर्व कार्यकर्त्याना सोबत घेऊन बांधणी करावी लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडणूक येतील यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन सोबत राहावं अस आवाहन माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले.