हिमायतनगर।पोलिस स्टेशन वाढोणा (हिमायतनगर) शहरासह तालुक्यातील अनधिकृत मस्जिद आहेत, त्या वरील भोंगे उतरवा व जे अधिकृत आहेत त्या वरील सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे त्याचा काटेकोरपणे पालन करा. अन्यथा आम्ही मस्जिती समोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावू अस इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कडून निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी मनसे शहर अध्यक्ष ओमकार रेखावार, मनसे विद्यार्थी तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील टेकाळे, मनविसे शहराध्यक्ष ओमकार चर्लेवार, मनसे तालुका उपाध्यक्ष अंकुश तिगलवाड, विश्व हिंदू परिषद शहर मंञी वाढोणा (हि.नगर) सुधाकर भाऊ चिटृॆवार , बजरंग दल सदस्य सोपान भाऊ कोळगीर आदींच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.