महिलांचा मोठा सहभाग; भजनाच्या तालावर नाचले युवक
नांदेड| जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवा संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीला उदंड प्रतिसाद मिळाला. या मिरवणुकीत मोठया प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या या मिरवणुकीची सांगता महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली.
सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष पांडागळे, स्वागत अध्यक्ष संजय बेळगे, कार्याध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, शिवाचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल महाळगे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, राज्य सरचिटणीस विठ्ठल ताकबिडे, दिगंबर मांजरमकर, बालाजी इबितदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना हार घालून ही मिरवणूक वजिराबाद मार्गे जुन्या मोंढ्यातून महात्मा बसवेश्वर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबनराव बारसे,शिवाचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील बुड्डे, बालाजी बंडे, शंकर पत्रे, जी.एस.मंगनाळे, शिवाजी कहाळेकर, विजय हिंगमिरे, बाबुराव कैलासे, संभाजी पावडे, शिवराज उमाटे,श्रीकांत आरसेवाड, संग्राम काडवदे, सिध्देश्वर स्वामी, निळकंठ चोंडे,चंद्रशेखर शिराळे, डॉ.शंकर धमनसुरे, महावीर शिवपुजे, डॉ.संतोष स्वामी,वीरभद्र बसापुरे, नंदाताई पाटील,नंदूअप्पा देवणे यांच्यासह शिवा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.