पासदगाव शिवारात साकारतेय १० फुटांची बुद्धमूर्ती -NNL


नांदेड|
तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरात असलेल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १० फुटांची संगमरवरी अखंड पाषाणाची बुद्धमूर्ती बसवण्यात येणार आहे. त्यासाठी राजस्थानहून दगड मागविण्यात आला असून पासदगाव शिवारात बुद्धमूर्ती कोरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

या कामी अनेक शिल्पकार कार्यरत आहेत. बुद्धमूर्तीसाठी साडेआठ लाख रुपये खर्च येत असून उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला आर्थिक दान करावे असे आवाहन अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे. ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दहा फुटांची संगमरवरी दगडाची अखंड पाषाणात कोरलेली बुद्धमूर्ती लवकरच बसविण्यात येणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. 

मालेगाव रोडवरील दीपक नरवाडे यांच्या शेतात बुद्धमूर्तीचे शिल्प कोरण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी अनेक उपासक उपासिकांनी भेट दिली. मोठ्या प्रमाणावर दान मिळण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी दर महिन्याच्या १९ तारखेला खुरगाव येथे पौर्णिमोत्सव हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमासाठी  जिल्हा तसेच सीमावर्ती भागातील श्रद्धावान उपासक उपासिकांनी उपस्थित राहावे आणि तयार होत असलेल्या बुद्धमुर्तीला आवर्जून भेट द्यावी असे श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी