लोहा| नांदेड येथील रहिवासी असलेले देवराव मारुती सावतगण यांचे हृदय विकाराच्या आजाराने डोबिवली मुंबई येथे निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ६८वर्ष होते त्यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
वाणी पिंपळगाव (ता पालम)या मूळ गावचे असलेले देवराव सावतगण हे एस टी चालक कालवश तुकाराम सावतगण यांचे छोटे बंधू होते.ते अनेक वर्षा पासून मुंबई -डोबिवली येथे स्थायिक झाले होते. पश्चात पत्नी निलाबाई थोरला मुलगा सचिन जो आस्ट्रेलिया येथे इंजिनिअर असून, धाकटा मुलगा विनय कंपनीत आहे.
मुलगी शांता मनोहर हटकर व ज्योती राजू दुधमल या दोन विवाहित मुली आहेत .पुतण्या एसटी महामंडळ मधील .मिलिंद सावदगण, अरविंद सावदगण हे पुतणे आहेत.त्यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लोह्याचे चंद्रकांत हरिहर धुतमल व देवराव सावतगण हे आत्या मामांचे होते.