लोहा| विज्ञान विषयाचे तज्ञ शिक्षक प्रशांत मोटरवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वाचनालयासाठी दोनशे पुस्तके व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार, माजी नगराध्यक्ष किरण सावकार वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, विठ्ठलेश्वरचे संचालक लक्ष्मीकांत बिडवई, अंध शाळेचे संस्थापक डॉ संजय गुंडावार, शाळेचे मुख्याध्यापक डी ई वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार, डॉ याकूबखान उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सुलतान खान, अजय चितलवार, (धर्माबाद) सौ प्रीती चिंतलवार इजि प्रमोद मोटरवार, पंकज मोटरवार, अशोक मोटरवार, सूर्यकांत मोटरवार.
सौ. संध्या दमकोंडावार, नागेश दमकोंडावार, सरस्वतीचे व्हाईस चेअरमन हरिभाउ चव्हाण, ज्ञानेश्वर मोटरवार, नारायण गोणे, अनिल दाढेल, हणमंत कटकमवार, गजानन कोटगीरे, यासह मोटरवार कुटुंबातील सदस्य तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रशात मोटरवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आल्या प्रास्ताविक मुख्याध्यापक दामोदर वडजे यांनी केले. सोनू संगेवार, नारायण गोणे, हरिहर धुतमल यांनी आठवणी सांगितल्या संचलन आर आर पिठ्ठलवाड यांनी तर आभार मुख्याध्यापक एच जी पवार यांनी मानले.