किनवट, माधव सूर्यवंशी| किनवट माहूर विधानसभेचे माजी आमदार लोकनेते प्रदीप नाईक यांच्या कार्यावर प्रेरित होऊन येथील आदिवासी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते जयवंत बोंबले व महादेव कोळी समाजाचे युवा कार्यकर्ते श्रीकांत बोईनवाड यांनी आज दि.4 मार्च रोजी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते प्रवेश केला आहे.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रदीप नाईक म्हणाले की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असून कार्यकर्त्यांनी आत्ताच वाडी पाडी तांड्यात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ते निवारण करण्यासाठी प्रयत्न करून पक्षासाठी बळकटी प्राप्त करावी असे आ.नाईक यांनी कार्यकर्त्यांना बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. दरम्यान आदिवासी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते जयवंत बोंबले यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या कार्याला प्रेरित होऊन त्यांनी आज दिनांक 4 मार्च रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते प्रवेश केला असून ते भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तर महादेव कोळी समाजाचे धडाडीचे युवा कार्यकर्ते तथा गजानन पाटील मुंडे यांचे खंदे समर्थक श्रीकांत बोईनवाड यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे.
दरम्यान पक्ष प्रवेशानंतर जयवंत बोंबले बोलताना म्हणाले की प्रदीप नाईक हा किनवट आणि माहूर तालुक्याचा विकासाचा महामेरू असून, येणार्या भविष्यकाळात प्रदीप नाईक यांना विजयाच्या शिखरावर नेऊन पोचवण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पाईक म्हणून कुठलीही कसर बाकी ठेवला आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा विजय निश्चित असणार असल्याचे ते आपल्या भाषणातून व्यक्त महादेव कोळी समाजाचे युवा धडाडीचे कार्यकर्ते श्रीकांत बोईनवाड यांनी आपल्या मनोगतातून म्हणताना सांगितले की माजी आमदार प्रदीप नाईक हे सर्वसमावेशक लोकनेते असून, त्यांनी किनवट माहूर मतदारसंघातील शेवटच्या टोकापर्यंत या सर्वसामान्य माणसांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केले असून, हे त्यांच्या कार्याची दखल घेत व प्रेरित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या भविष्यकाळात पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी व पक्ष संघटना साठी मी कार्य करणार असून पक्षासाठी बळकटी प्राप्त करून देणार असल्याचेही त्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केले.
याप्रसंगी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, विनोद राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष गजानन मुंडे पाटील, डोंगरी विकास विभाग समिती सदस्य राहुल नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य समन्वयक आदिवासी नेते जयवंत वानोळे, नगर परिषदेचे गटनेते जहिरोद्दीन खान, युवा नेते बालाजी बामणे, प्रविणा म्याकलवार, अमरदीप कदम पाटिल, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अजित साबळे, कचरू जोशी, सरुभाई, बालाजी बंटी पाटील, रामदास राठोड निचपुरकर, अशोक सूर्यवंशी, नागनाथ भालेराव, तायेर भाई, अश्विन पवार, प्रमोद राठोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.