ता अध्यक्ष बालाजी राठोड यांनी निवेदनाद्वारे दिला इशारा
कंधार। दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व मा. तहसिलदार साहेब व गटविकास अधिकारी कंधार यांना ता अध्यक्ष शिष्टमंडळाने दोन्ही अधिकारी यांना निवेदनाद्वारे त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी नायब तहसीलदार साहेब यांना प्रत्येक विषयावर चर्चा करून निवेदण स्विकारले व लेखी कळविण्याचे आश्वासन दिली.
गटविकास अधिकारी यांना शिष्टमंडळ निवेदन घेण्यासाठी कोणताही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आवक इनवर्ड ला निवेदन देण्यात आले. दिव्यांगाचे खालील प्रश्न - 1) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी. 2) दिव्यांग मित्र अॅप नांदेड8 जुलै 2020 ची अध्याप अंमलबजावणी नाहि. ३) दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदान वेळेवर का मिळत नाही यांच्या कारणासहित माहिती द्यावी.
4) तहसील मार्फत मिळणाऱ्या अनुदान पाञ करण्याची मिंटिग दरमहा का होत नाही, मिंटिंग मध्ये पाञ झालेल्या लाभार्थ्यांना सहा ते सात महिने अनुदान का मिळत नाही? मंजुर झाले केंव्हा अपाञ हे लाभार्थ्यांना का कळविले जात नाही याची माहिती देण्यात यावी.
5) तहसिल मार्फत अनेक योजनेत मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुर झालेल्या महिन्यापासून अनुदान दिले जाते कि त्यांचा नियम कसा आहे त्यांची माहिती देण्यात यावी. 6) संजय गांधी ईतर योजनेत कमिटी का करण्यात आली नाही त्यात दिव्यांग बांधताना स्थानिक कमेटित का घेतले जात नाही
7) खासदार निधी/ दर वर्षी विस लाख दिव्यागाना स्थानिक मतदार संघात खासदार निधी २०१६ पासुन का मिळत नाही? 8) आमदार निधी /पंधरा लाख दरवर्षी दिव्यांगाना स्थानिक मतदार संघात आमदार निधी २०१६ पासुन का मिळत नाही?
9) अंत्योदय राशन योजना / दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद आहे आपल्या तहसिल मार्फत किती दिव्यांगाना लाभ दिला किंव्हा दिला नाही यांचे कारणासहित माहिती लाभार्थी यादी द्यावी. सर्व नऊ प्रश्नांचे लेखि ऊतर देण्यात येईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात कंधार ता अध्यक्ष बालाजी राठोड. ता ऊप अध्यक्ष बालाजी पाटिल कळकेकर सचिव चांदु गवाले, चंद्रकांत जाधव ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्ध पञक दिले