लेंडी प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार, आ. डाॅ.तुषार राठोड यांच्या प्रयत्नाला यश -NNL

मुक्रमाबादच्या स्वेच्छा पुनर्वसनासाठी 77 कोटी मंजूर, ईत्तर ११ गावांचे काय ? 


नांदेड/ मुखेड|
मागील २०१२ पासून रखडलेल्या लेंडी या आंतरराज्य सिंचन प्रकल्पाच्या कामास आता गती प्राप्त होणार असून, जिल्हाधिकारी नांदेड यांचे पत्र १७/७/२०१८ व गोदावरी मराठवाडा पाठबंधारे विकास महामडळ औरंगाबाद यांचे पत्र दि.२४/१/१९ चा प्रस्ताव, महसुल व वन विभाग मंत्रालय २०२२ अन्वये निर्गमित पत्रानुसार मुक्रमाबाद येथील प्रकल्प बाधित कुटूंबियांसाठी स्वेच्छा पुनर्वसन योजना शासनानी मान्य केले आहे. 

यासाठी ७७ कोटी च्या वर रूपयाची आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. यामुळे आता लेंडी प्रकल्पाच्या कामास गती मिळणार असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यात आसे आहे. शेतकरी प्रती कुटूंबास रुपये रु.४.९९ लक्ष, तर बिगर शेतकरी प्रती कुटूंबास रु, ३६९ लक्ष रुपये या प्रमाणे एकुन रक्कम ७७४४-७८लक्ष मुक्रमाबाद स्वेच्छा पुनर्वसन साठी मंजुरी चे पत्र शासन निर्गमित केले आहे. या  धरणास सुरुवात १९८६ साली या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. दरम्यानच्या काळात सद्य स्थितीत या धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र घळभरणीचे काम शिल्लक आहे. या प्रकल्पाच्या संयुक्त कालव्याची कामे प्रगती पथावर आहेत. तेलंगणा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या या धरणाच्या महाराष्ट्राच्या हद्दीतील कालव्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. 

सदरील प्रकल्पातील बाधित असलेल्या १२ पैकी ११ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न जवळजवळ मार्गी लागला असून मुक्रमाबाद येथील गावठाणा करता एकत्रितपणे एकाच ठिकाणी जमीन उपलब्ध होत नसल्यामुळे स्वेच्छा पुनर्वसनाच्या पर्यायाद्वारे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी स्थानिक आमदार डाॅ.तुषार राठोड यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. मुक्रमाबाद येथील एकूण प्रकल्पबाधित कुटूंबियांसाठी स्वेच्छा पुनर्वसनास शासनाने मान्यता दिली आहे.शासन निर्णय महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन पुनस्थापना सनियंत्रन समितीच्या दि,१३/७/२०२१ दिनाच्या बैठकीतील तसेच नियोजन विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रंदन,१४/९/२०२० व वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ २६/२०/२०


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी