शेळगांव च्या रितेश वाघमारे ची मेडीकल एमबीबीएस साठी पात्र- NNL


नायगांव , दिगंबर मुदखेडे। नांदेड जिल्ह्यातील आदर्श गांव शेळगांव (गौरी) ता.नायगांव येथील गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक चळवळ व आनेक उच्च पदाच्या परिक्षा पास झाल्यानंतर शेळगांव (गौरी) ओळख देशाच्या काना-कोपर्यापर्यत निर्माण झाली आहे,यावर्षी सुद्धा रितेश चंद्रकांत वाघमारे या  विद्यार्थ्यांचा मेडिकल एमबीबीएस साठी नांव पात्र ठरले आहे.

 नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव (गौरी) येथील सामान्य दलीत कुटुंबातील चंद्रकांत ग्यानोबा वाघमारे याचा हा मुलगा मेडिकल(एम.बी.बी.एस) प्रवेशास  रितेश चंद्रकांत वाघमारे शेळगावकर या विद्यार्थ्यांची वर्धा मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएस साठी प्रवेशासाठी निवड झालेली आहे डॉक्टर च्या यादीत  मानाचा तुरा आसलेल्या या वैद्यकीय क्षेत्रात  रितेश वाघमारे याचे यश हे त्यांचे आई-वडील व मार्गदर्शक शिक्षक  यांच्या बळावर मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

शेळगांव (गौरी) चे आयएएस म्हणून योगेश पाटील यानी मान मिळवला याआधी सुद्धा मेडीकल ला जवळजवळ 8-10 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. रितेश वाघमारे याचे मेडिकल साठी निवड यादीत नाव आल्यानंतर गावचे नेते माधवराव पाटील शेळगांवकर, प.स. उपसभापती संजय पाटील शेळगांवकर.गावचे सरपच तथा प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे.उपसरपंच सौ.शालीनीताई  राजेन्द्र पाटील शेळगांवकर.माजी चेअरमन सुनिल रामदासी.माजी सैनिक मोहन मेडाबलमेवार.ग्रामपंचायत सदस्य प्रा,सय्यद समदानी.संगीता लक्ष्मण काबंळे, सुधाकर पाटील.अशोक तात्या बावणे.साहेबराव बावणे.गजानन शिंपाळे.बाबु पाटील शिंपाळे.भाऊसाहेब पाटील.माधव घाटोळे.नागनाथ टेकाळे.जयराम बळेगावे.सय्यद चाँदसाब.हुशेनसर सय्यद.पत्रकार संतोष देशमुख.तानाजी वाघमारे.गगांधर हवेलीकर.श्रीराम वाघमारे.लक्ष्मण वाघमारे.राजेन्द्र वाघमारे.सटवाजी घोरपडे.मारोतीआप्पा मेडाबलमेवार.शिवाजी माली पाटील, माधवराव वाढवणे.नागनाथ वाढवणे, दत्ताहारी शिंपाळे.विनायक बावणे. आदि गावकरी मंडळी रितेश वाघमारे चे अभिनंदन करुन पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या तर रितेश चंद्रकांत वाघमारे यानी मला खुप अंनद झाला माझ्या आई-वडिलांची इच्छा होती ति पुर्ण होत आहेत व मि यापुढेही खुप मेहनत घेईन आसा विश्वास दिला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी