पोलीस ठाण्याजवळील बेरोजगार युवकांच्या स्टोलवर मिळेल गुळाची चहा
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील बाजार चौक पोलीस स्थानक परिसरात असलेल्या ज्ञानेश्वर बास्टेवाड या बेरोजगार युवकाने सुरु केलेल्या चहाच्या स्टोलवर आता गुळाच्या चहाला देखील पसंती मिळू लागली आहे. या युवकाने चवदार चहा बनविण्याचं प्रशिक्षण पंढरपूर येथे घेतलं होत.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही दिवसेंदिवस मधुमेह व इतर आजारांचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे साखरेचे पदार्थ अनेकांकडून टाळले जात आहेत. अशा परिस्थितीत गावरान गुळाचा चहा किंवा गावरान गूळ विविध आजारांवर गुणकारी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले असल्याने ग्रामीण भागात गुळाच्या चहाला पसंती मिळत आहे.
जुन्या काळी असलेली गुऱ्हाळे बंद झाली असली तरी अजूनही ग्रामीण भागात गावरान, गुळाची निर्मिती नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी केली जाते. गूळ निर्मितीसाठी विविध वनस्पतीचा रस टाकून गुळाची निर्मिती केली जाते. यामुळे साखरेपेक्षा गुळाच्या चहाला आता सर्व स्तरातून पसंती मिळत आहे. त्या अनुषंगाने हिमायतनगर येथील बाजार चौकातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर व पोलीस स्थानक नजीक असलेल्या वैष्णवी टी सेंटर स्टोलवर गुळाचा चहा विक्री केला जात आहे.
येथील गुळाची चहा विक्री करणारे ज्ञानेश्वर बास्टेवाड यांनी सांगितले कि, मी अगोदर पंढरपूर येथे वडिलांसोबत राहत होती. बेरोजगारीमुळे आणि पंढरपूर येथील चहा प्रसिद्ध असल्यामुळे मी येथे राहून चहाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर हिमायतनगर येथे चहाचा गाडा सुरु केला, तेंव्हापासून माझ्या स्टोलवर मिळणारी चहा शहरभर प्रसिद्ध आहे. शहरातील बहुतांश नागरिक येथे येऊन चहा घेतात.
गेल्या काही महिन्यापासून मधुमेह व इतर आजारांने ग्रस्त असलेल्या अनेकांनी मला गुळाचा चहा बनविण्याचे सुचविले. तेंव्हापासून गुळाच्या चहा विक्रीला सुरुवात केली आहे. हा चहा चवदार आणि प्रकृतीला फायदेमंद असल्याने गुळाच्या चहाला अनेकांनी पसंती दिली आहे. यासाठी गुळा बरोबर स्पेशल पावडर वापरली जाते आहे, त्यामुळे चहा एकदम स्वादिष्ट होतो. आणि शुगर असलेले व ऐसिडीटीने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हि चहा उपयुक्त असून शुगर फ्री आहे. त्यामुळे गुळाच्या चहाला मागणी वाढली आहे.
गुळाचा साखरेचा चहा पिल्याने असिडिटीचा त्रास होतो. परंतु गुळाचा चहा गुणकारी असल्याने त्याचा त्रास होत नाही. यामुळे आमचा कल गुळाचा चहा पिण्याकडे आहे. मी खास करून वैष्णवी टी सेंटरवर गुळाचा चहा घेतो. त्यामुळे गुळाचा चहा पचनास उपयुक्त असल्याने साखरे ऐवजी गुळाचा चहा सर्वानीच घ्यावा असे अनेक ग्रामस्थांनी सांगितले.