कार - दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सेवकाचा उपचारसदरम्यान मृत्यू -NNL

हिमायतनगर तालुक्यातील दरेगाव पाटीजवळ सकाळी घडली होती दुर्घटना     


हिमायतनगर|
तालुक्यातील हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दरेगाव पाटीजवळ हि घटना दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास दुचाकी - आणि कारची समोरासमोर धडक झाली होती. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना नांदेडच्या खाजगी रुग्णालयात त्याची प्राणज्योती मालवली. सुखदेव रेनबा दर्शनवाड वय ४० वर्ष असे मयत युवकाचे नाव आहे.

हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु.येथील मनीषा आश्रम शाळेवर गेल्या १५ वर्षांपासून काम करणारा सेवक सुखदेव रेनबा दर्शनवाड वय ४० वर्ष हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच २६ बी एच ३६०४ वरून नित्याप्रमाणे भोकरहून पोटा येथील शाळेकडे निघाले होते. दरम्यान ९.३० वाजेच्या सुमारास वडगाव जवळील दरेगाव पाटीच्या १०० मीटर अंतरावर येताच कामारीहून नांदेडकडे येणारी पांढरी कार क्रमांक एम एच १४ जी एस ४०८९ ची व दुचाकीची समोरासमोर धडक लागली. या अपघातात दुचाकीला जबर धडक लागल्याने दुचाकीस्वार सुखदेव दर्शनवाड वाहनासह रस्त्यावर पडल्याने त्याना गंभीर दुखापत झाली. 

हे समाजातच तातडीने नागरिकांनी सदर जखमीला भोकर येथे हलविले, तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. येथे उपचार सुरु असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुखदेव रेनबा दर्शनवाड यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यू पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवदेह नातेवाईकांना सोपविण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अशी माहिती मनीषा आश्रम शाळेचे शिक्षक श्री सूर्यवंशी सर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली.   घटनेची माहिती तामसा पोलिसांना मिळताच त्यांनी उपस्थित होऊन अपघाताचा पंचनामा केला असून, या संदर्भात तामसा पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी