प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने विकासकामे पूर्ण करावी - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत - NNL

श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामांचा आढावा


मुंबई|
श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

आराखड्यातील विकासकामांच्या प्रगतीबाबत श्री.सामंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आराखड्यातील विविध कामे प्रलंबित आहे. विकासकामे तातडीने पूर्ण करावे. विकासकामांना पूर्णत्वास नेण्याची प्रत्येकाची सांघिक जबाबदारी आहे. जनतेला पायाभूत सुविधा पुरविणे ही नैतिक जबाबदारी ओळखून प्रशासनाने काम करावे. येत्या जानेवारी पर्यंत विकास आराखड्यातील सर्व पायाभूत सुविधांची कामे, शैक्षणिक क्षेत्रातील कामे, पाणीपुरवठा, नळपाणी योजना, रस्ते विकास आणि व्यापारी संकुलाविषयी प्रलंबित कामांची प्रक्रिया राबवून प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही श्री.सामंत यांनी यावेळी दिले.

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ अंतर्गत रत्नागिरी येथे सुरू होणाऱ्या उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करा -उदय सामंत  

 कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर  अंतर्गत रत्नागिरी येथे उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या.

आज मंत्रालयात याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री.सामंत म्हणाले, उपकेंद्रासाठी लागणारी जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.या उपकेंद्राचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. रत्नागिरी उपकेंद्र स्वयंपूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ यांच्याशी समन्वय करून बीएस्सी.हॉस्पिटँलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केल्यास रत्नागिरी परिसरातील पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना लाभ होईल. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन प्रशिक्षीत मनुष्यबळाची निर्मिती होईल.

या उपकेंद्रामध्ये सन 2021-22  करिता एम.ए.(संस्कृत,योगशास्त्र,ज्योतिषशास्त्र), बी.ए.(योगशास्त्र), बीसीसीए.पदविका (संस्कृत,योग, वास्तुशास्त्र) सन2022-23पासून सुरू होणार अभ्यासक्रम बी. एससी.(हॉपिटँलिटी स्टडीज),बी.बी.ए,बी.ए,(सव्हील सर्व्हिसेस, कौशल्य विकासोन्मुख अभ्यासक्रम.सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी