स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या मागणीने छत्रपती ते भवानी चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात -NNL


नांदेड|
शहरातील छत्रपती चौक ते भवानी चौक रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी केल्यानंतर अवघ्या चार दिवसात रास्ता कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या मागणीला मिळाले असल्याचे दिसते आहे. 

रस्त्याचे काम सुरु झाल्यानंतर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय माधवराव पाटील देवसरकर यांनी पाहणी केली यावेळी उपस्थित स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम, जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगणूरे, जिल्हा उपाध्यक्ष माधव पाटील वडवळे, राज पाटील मोरे, विजय पाटील गोरख, सुनिल पाटील शिंदे, भिमराव बुक्तरे उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय माधवराव पाटील देवसरकर यांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम तसेच दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगणुरे यांचे कौतुक केले व स्वता पुर्णा रोड वर येऊन कामाची पाहणी केली.

पुर्णा रोड हा छत्रपती चौक पासुन जय भवानी चौकापर्यंत अत्यंत खराब झाला होता. सदरील रोडवरून हा१० ते  १२ गावचा नांदेड शहरात यायचा प्रमुख रस्ता असुन, ह्या रस्त्यावर भरपूर खड्डे झाले होते. त्यामुळेच हा रस्ता हा तात्काळ दुरुस्त करून द्यावा ही मागणी सोशल मिडीयावर जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम यांनी केली होती. नंतर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ.बालाजी पेनुरकर साहेब जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम, जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगणूरे व तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड यांनी मागणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे साहेब यांच्याकडे हा रस्त्याची डागडूगी तात्काळ करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

याची दाखल घेऊन अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे साहेब व उप अभियंता विशाल चोपडे यांनी ४ दिवसात हा रस्ता खड्डेमुक्त करून देतो असे आश्वासन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड टिमला दिले होते व लगेच ४ दिवसात कामास सुरुवात केली त्याबद्दल स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अधिक्षक अभियंता अविनाशजी धोंडगे साहेब व उप अभियंता विशाल चोपडे यांचे विशेष आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी