मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिले निवेदन -NNL

मतदार संघातील रखडलेली कामे मार्गी लावण्याचे दिले आश्वासन 


नांदेड|
हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील रखडलेल्या विविध कामे व समस्या सोडविण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामुळे ते आमदार असताना त्यांच्या कार्यकाळात प्रस्तावित करण्यात आलेली सिंचन बंधारे, विविध विकासकामे आणि गतवर्षी पिकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास होत असलेली टाळाटाळ याबाबत निवेदन देऊन चर्चा केली आहे. यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मीळण्याची आशा वाढीस लागली असून, सिंचनचाही प्रश्न निकाली निघेल अशी रसात अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली असून, त्यानी निवेदन देऊन विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी ठिकठिकाणी उच्च पातळीचे बंधारे बांधण्यात यावे असे प्रस्तावित केले होते. मात्र ती कामे मार्गी लागण्यापूर्वी विधानभेच्या निवडणूक झाल्या आणि बंडखोरीमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यांनी खचून ना जात पुन्हा जनहिताच्या कमल सुरुवात केली आहे. त्यांच्या कात्याकाळात पूर्णत्वास गेलेल्या अनेक कामे आज घडीला जनता पहाटे आहे. आमदार नसताना देखील एका आमदाराने कारवी ती कामे आपणही केली पाहिजे हा ध्यास ठेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीत असतं देखील सत्ताधाऱ्यांकडून मित्र पक्षांना घेऊन विकास कामे करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जोरदार चर्चा हदगाव-हिमायतनगर तालुक्यात होते आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि सिंचनाची कामे प्रलंबित राहत असून, मतदार संघातील वाढत्या समस्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे.

माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली असून, त्यानी निवेदन देऊन हदगाव-हिमायतनगर मतदार संघात 2020 या वर्षात हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. दरम्यान अतिवृष्टी होऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले, परंतु ऑनलाइन प्रक्रियेत असलेल्या अनंत अडचणी यामुळे काही शेतकरी विमा कंपनीला वेळेवर माहिती देऊ शकले नाही तर बहुतांश शेतकऱ्यांनी माहिती दिली. परंतु शासनाने झालेल्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली असताना पिक विमाकंपनी मात्र विमा भरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मोबदला देत नाही. या आर्थिक अडचणीतही शेतकऱ्यांनी वर्षभराचा खर्च कर्ज काढून कसाबसा भागविला आहे. ही बाब नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पटवून सांगितली असून, सिंचनाच्या कामाच्या बाबतीतही प्रश्नापासून होत असलेली दिरंगाई तात्काळ दूर करून हदगाव हिमायतनगर मतदार संघात मंजूर करण्यात आलेली सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्णत्वास नेण्यासंदर्भात संबंधित विभागाला आदेशित करावे असे साकडे घातले आहे.


नुकतेच वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा,ना,उद्धवजी ठाकरे साहेब यांची मा.आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भेट घेतली. दरम्यान हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील रखडलेल्या बंधाऱ्यांची काम, रखडलेल्या पीकविमा मागच्या वर्षीचा आणि आत्ता झालेल्या अतिवृष्टी संदर्भात मुख्यमंत्री साहेबासोबत अर्धा तास सविस्तर चर्चा झाली. लवकरच रखडलेले काम पूर्ण करण्याचे आश्वासन मा.मुख्यमंत्री साहेबानी दिले व इतर विषयावर चर्चा झाली असल्याची माहिती शिवसेना संघटक संजय काईतवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी