ईस्लापुर| इस्लापूर भागात गेल्या अनेक दिवसापासून पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे मटका, जुगार चालविला जात आहे. याबाबतची माहिती पोलिसांना असताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेकांचे संसार देशोधडीला लागत आहे. दिवसभर काबाड कष्ट केलेली कामे नौरोबा मटका जुगारात उडवीत असल्याने घरसंसारात दररोज भांडण तंटे होत आहेत.
याबाबतची मिळाल्यानंतर नांदेडच्या एलसीबी पथकास मिळाल्यानंतर त्यांनी दि.१२ जुलै २०२१ रोजीचे दुपारी १ वाजेच्या सुमारास शिवाजी चौक ते फॉरेस्ट नाका इस्लापूर येथील रोडवर दंतलवाड कॉम्पलेकस बोळीमध्ये अचानक छापा टाकला. यावेळी तीन आरोपीतांनी बिना परवाना बेकायदेशिर रित्या मॉर्नीग ओपन नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असताना दिसून आले. यावेळी त्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून नगदी ३ हजार २२० रुपये व साहित्यासह मिळुन आले. अशी फिर्याद पोना/संजीव पिराजी जिंकलवाड स्थागुशा यांनी दिल्यावरुन पोस्टे इस्लापुर येथे गुरंन ६१/२०२१ कलम १२ (अ) मजुका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादर घटनेचा तपास सपोउपनि/अन्वर शेख हे करीत आहेत.
इस्लापूर येथील कायमस्वरुपी मटका बंद करा. अशी मागणी करण्यात येत असून, मटका - जुगार बंद झाला नाहीतर न्यायालयाच्या परवानगीने आरोपीचां व सक्षम अधिकार्याचा मोबाईल CDR काडुन त्यांच्याविरुद्ध दोषारोप दाखल करनार असल्याची प्रतिक्रिया या भागाचे रहिवाशी असलेले अॅड. प्रकाश काबळे यांनी दिली आहे.