नुकसान भरपाई द्या अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबवणार
हिमायतनगर,अनिल नाईक| सोयाबीनच्या शेतामध्ये कीटकनाशक फवारल्यानंतर सोयाबीन करपून गेल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरानजीक पळसपुर रस्त्यावर विठ्ठल कदम या शेतकऱ्याच्या शेतात घडली आहे. यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले असून, या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांचे जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नुकसान भरपाई मिळाली नाहीतर आंदोलनाचा मार्ग अवलंबवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर शहरातील विठोबा रामराव कदम यांची पळसपुर रस्त्यावर सर्वे नंबर ५/५/१ या गट नंबरमध्ये शेती आहे. त्यांनी खरिपाच्या हंगामात शेतीमध्ये तीन एकरात सोयाबीनची पेरणी केली आहे. चांगला पाऊस होत असल्याने सोयाबीनचे पीक सध्या वाऱ्यावर डोलू लागले आहे. दरम्यान सोयाबीन वर झालेल्या आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि उत्पन्न चांगले मिळावे या आशेने दिनांक ५ जुलै २०२१ रोजी शहरातील अभिरा ट्रेडिंग कंपनी हिमायतनगर येथून Sarpanch GSP कंपनी, 12.61.00 Akshal कंपनी, अवतार Indofill कंपनी या सर्व कंपनीचे औषध फवारणीसाठी वापरले होते.
पण फवारणी केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेतातील 60 ते 70 टक्के सोयाबीन पीक करपून गेले आहे. करपून जातं पूर्ण प्लॉट ना जात मध्ये १ ओळ सोडून ओळीच्या ओळी करपले असल्याच्या प्रत्यक्षदर्शी पाहावयास मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, आगामी काळात येणाऱ्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सदर युवा शेतकऱ्यांनी संबंधित दुकानदारास याबाबतची माहिती देऊन माझ्या शेतीत झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईची द्यावी अशी मागणी केली. परंतु दुकानदाराने या आमच्या औषधाने काही झाले नाही. तुमचीच कुठेतरी चूक झाली असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून दुकानात पुन्हा येऊ नका अशाप्रकारे भाषा वापरून दुकानदाराने शिवीगाळ करत दुकानाबाहेर हाकलून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे माझ्या शेतीत फवारणीमुळे सोयाबीनचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अभिरा ट्रेडिंग कंपनी हिमायतनगर यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी. आणि मला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांन जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय नांदेड, तहसीलदार हिमायतनगर, तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. या तक्रारीनंतर मला नुकसान भरपाई नाही मिळाली तर वेळप्रसंगी मी आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे सदर शेतकऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.