भाजप जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांची मागणी
नांदेड| येथील उर्दू घरास अभिनेता दिलीप कुमार यांच्या नावाला भाजपाचा तीव्र विरोध असून त्या ऐवजी माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी पत्रक काढुन केली .
नांदेड येथील उर्दू घर हे नवीन पिढी साठी प्रेरणा दायी बनावे , त्यामुळे त्याला नाव देतांना सुद्धा सामाजिक बांधीलकी जोपासनार्या, सर्व सामान्यांचे जीवन जगून देशाहितासाठी आयुष्य समर्पित केलेल्या. तसेच भारताला परकीय आक्रमना पासून सुरक्षित ठेवण्यासाठी अणुबॉम्बच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असलेल्या माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे नाव न द्यायला पाहिजे हात
मात्र त्यांचे नाव न देता त्याऐवजी सध्याच्या पाकिस्तान मधे जन्मलेल्या भारतात येवून केवळ चित्रपटात हीरोची भूमिका करून नाव व पैसा कमावलेल्या व पाकिस्तानशी आपुलकी ठेवलेल्या, कुठल्याही प्रकारची सामाजिक बांधीलकी न जोपासलेल्या फक्त फिल्मी हीरो दिलीप कुमारच्या नावाला भाजपचा तीव्र विरोध आहे, त्यामुळे नवाब मलिक यांच्या सारख्या जातीवादी नेत्याने दिलीप कुमार च्या नावाची जी घोषणा केली त्याचा भाजपच्या वतीने निषेध करतो व उर्दू घरास डॉ अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची विनंती करतो, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले