शासकीय कामात अडथळा करून धनादेश फाडणाऱ्यावर कार्यवाही करा- ग्रामसेवक संघटना -NNL


हिमायतनगर,अनिल नाईक| तालुक्यातील कमारवाडी येथील सरपंच महिलेच्या पतिराजाने ग्रामपंचायतीत धुडघूस घालून महिला ग्रामसेवकाशी हुज्जत केली. एवढेच नव्हेतर चक्क धनादेश फाडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. याप्रकरणी त्याचेवर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्याकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अर्जदार श्रीमती एसबीसी ग्रामसेवक म्हणून ग्रामपंचायत कार्यालय कामारवाडी येथे गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहेत. आज दि.१६ रोजी त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेल्या होत्या मासिक सभा घेऊन नित्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे कामकाज करत होत्या,. यावेळी सरपंच श्रीमती सारिका श्यामसुंदर हुलकाणे यांचे पती श्यामसुंदर प्रकाश हुलकाणे हे दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात आले. पाइप टाकण्याच्या कामाची रक्कम मागणी केली त्यावरून ग्रामसेविकेने ग्रामनिधीच्या खात्यातीळ धनादेश क्रमांक ००७३६३ वर रक्कम रुपये अकरा हजारचा धनादेश त्यानं देऊन पुस्तिकेची अभिलेख रेकॉर्ड स्लीपर त्यांना स्वाक्षरी करण्याबाबत विनंती केली.

यावेळी त्यांनी एकेरी भाषेत तुला रेकॉर्ड स्लीपर माझी सही कशाला आवश्यक आहे. खूप नियमाने काम करणारी झाली का..? असे म्हणत आई बहिणीवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तू कशी नोकरी करते बघून घेतो. असे म्हणत धनादेश फाडून माझ्या अंगावर फेकला. तेव्हा त्यांना विनंती करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू नका असे म्हणत असताना, ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्ची उचलून मला जीवे मारण्याच्या हेतूने माझ्या अंगावर धावून आले. तेव्हा ग्रामपंचायत कर्मचारी श्री विजय देवराव गजभारे उपसरपंच श्री संतोष उत्तमराव देवराय तसेच गावातील जेष्ठ नागरिक प्रकाश हरिभाऊ कलाने व विलास दशरथ माने यांनी मध्यस्थी करत त्यांना माझ्या अंगावर धावून येणापासून रोखले.


त्यामुळे माझा जीव बचावला असून, त्यांनी परत जाता जाता अश्लील भाषेत जे कि मी या ठिकाणी मांडू  शकत नाही अशा शिव्या दिल्या आहेत. तसेच तुला व तुझ्या कुटुंबाला मी पाहून घेतो अशी धमकी दिली आहे. त्यामुळे आज माझे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झाले असून, अवमान झालेला आहे. त्यामुळे ग्रामसेवक महिलेने हिमायतनगर पोलिस स्थानकात तक्रार देऊन संबंधितावर भारतीय दंड संहितेच्या योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन माझ्या व माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवितास कुठलीही हानी होणार नाही. याची दक्षता घ्यावी अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.

या निवेदनावर ग्रामसेविका सारिका भूमय्या श्रीरामवार यांची स्वाक्षर्‍या असून, हे निवेदन देताना  महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अशा उर्मट व कोणताही अधिकार नसताना कार्याकायात येऊन ग्रामसेवक महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या संबंधित सरपंच महिलेच्या पतीराजावर  गुन्हा दाखल करून कारवाई करावी. जेणेकरून इतर ग्रामपंचायत कार्यालयात कोणीही कोणत्याही महिला ग्रामसेवक सोबत असभ्य वर्तन करणार नाही. यासाठी हे निवेदन दिले असल्याचे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. याबाबत पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. असे आश्वासन त्यांनी संबंधित संघटनेला दिले असल्यामुळे सायंकाळपर्यंत शासकीय कामात अडथळा करून महिला कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व धनादेश फाडून अवमान करणारा व्यक्तीवर गुन्हा दाखल होईल का..?  याकडे ग्रामसेवक संघटनेसह सर्वच स्तरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

1 Comments

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी