लाखोंच्या दारूची केली नासधूस; पोलिसांनी भेट दिली
हिमायतनगर। तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील तालुक्यातील वाशी येथील महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला असुन, गावांमध्ये महिला मंडळींनी आक्रमक रूप धारण करत हातभट्टी आणि देशी दारू विक्री करणाऱ्या घरी छापा मारून दारु विक्री व हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य फेकून देऊन दारूबंदीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.
महिलांचे आक्रमक पवित्र्यामुळे बनावट दारूची अवैध विक्री करणार्यांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी देखील या प्रकाराकडे लक्ष देऊन या पुढे गावांमध्ये दारूची विक्री होणार नाही. याची काळजी घ्यावी अशी मागणी गावकरी महिला पुरुषांनी केली आहे. या संदर्भामध्ये ग्रामपंचायत तर्फे दारूबंदीचा ठराव घेण्यात आला असून, दारूबंदीचा ठराव निवेदन असे दोन्ही मिळून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून गावांमध्ये पुन्हा दारूविक्री होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि आडवी बाटली करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन येते निवडणूक घ्यावी अशी मागणी केली जाणार आहे.
त्यासाठी वाशी येथील ४० ते ५० महिलांनी आक्रमक रुप धारण करत जिथे दारू काढली जात त्या घरात घुसून दारूभट्या उध्वस्त केल्या, तसेच लाखोंच्या मालाची नासधूस करून दारूविरोधी आपली भूमिका उघड केली आहे. दारूबंदी करण्यासाठी गावचे सरपंच, सदस्य व शेकडा महिला पुरुष आदींनी सहभाग घेतला आहे. सरपंच गीताताई राठोड पंचफुलबाई मोरे, गीताती खारोडे, जिजाबाई काळे, पुण्यराठाबाई डवरे, अंजना खोकले, सखुबाई खूपसे, कलावती डवरे, राधाबाई जाधव, नागाबाई बोथीनगे, पंचफुला राठोड आदींसह अनेक महिला यात सहभागी झाल्या होत्या.