लोहा। अल्प भूधारक शेतकरी कर्जबाजारी झाल्याने आर्थिक विवेचनेत होता त्यातच पक्षघाताचा झटका आला होता शिवाय मुलींच्या लग्नाची काळजी आणि त्यातच नापिकी, असा कौटुंबिक समस्येनी त्रस्त आलेले शेतकरी भीमराव चंपती शिरसाट ( वय ४३ वर्ष) यांनी लोहा तहसिल कार्यालयाच्या इमारतीला गळफास लावून आत्महत्या केली .या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली .ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली
लोहा तालुक्यातील उमरा येथील भीमराव चंपती सिरसाट (वय 43) या शेतकऱ्याकडे दोन एकर जमीन आहे. शेतीतून उदरनिर्वाह होत नसल्याने मालवाहू ऑटो घेऊन उदरनिर्वाह करत होता. दरम्यान या काळात त्याला अर्धांगवायू झाल्यामुळे अपंगत्व आले होते. बँकेचे कर्ज तसेच खाजगी कर्ज असल्यामुळे तो अनेक दिवसांपासून अडचणीत होता . त्याच्या पत्नी दोन मुली, मुलगा भावाची मुलगी आई वडील असा मोठा परिवार आहे. अल्पभूधारक, त्यातच नापिकी, खाजगी सावकारी कर्ज, आर्थिक विवंचनेत हा शेतकरी होता .तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या इमारतीला गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली .ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती कळताच तहसीलदार परळीकर, पोलीस निरीक्षक संतोष तांबे तहसील कार्यालयात घटनास्थळी पोहचले पण सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले. माजी सभापती सतीश पाटील उमरेकर यांनी या घटनेत मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली.
मयत शेतकऱ्यांची ओळख पटवली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची डायरी , मोबाईल घटनास्थळी होती. त्यांनी मयत शेतकऱ्यांची ओळख पटली व डायरी मध्ये त्या शेतकऱ्यांचे नाव ,गाव मोबाईल नंबर सापडला आत्महत्या केलेला शेतकरी चंपती सिरसाठ (वय ४३ वर्ष गाव उमरा ता. लोहा ) त्याच्या नातेवाईकास माहिती व ते घटनास्थळी आले. विविध संघटनेचे पदाधिकारी व मोठा जमाव तहसील कार्यालयात जमा झाला त्यातील काही कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मयत शेतकरी कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका माजी सभापती सतीश पाटील उमरेकर यांनी घेतली.त्यानंतर सायंकाळी मृतदेह इमारतीवरून काढण्यात आला शवविच्छेदन व पंचनामा करण्याची प्रक्रिया ग्रामीण रुग्णालयात पूर्ण झाली. तहसील कार्यालयाच्या खबरीवरून अकस्मात गुन्हा लोहा पोलिसांनी दाखल केला व मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. रात्री उमरा यागावी मयत शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर ,डीवायएसपी किशोर कांबळे, उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार , यांनी घटनास्थळी भेट दिली .तहसीलदार परळीकर यांनी आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना न्याय देऊ असे आश्वासन दिले .माजी सभापती सतीश पाटील उमरेकर यांच्या संयमी भूमिकेमुळे पुढील प्रसंग टळला. दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन चव्हाण संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव, गजानन पाटील चव्हाण ,छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार, माऊली गिते , बाळासाहेब जाधव , आदी ने भेट देऊन आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मागणी केली.
● मयत शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देऊ - उपजिल्हाधिकारी●
घडलेली घटना दुर्दैवी असून, आत्माहत्या ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर यावेळी घटनास्थळी भेट दिल्या नंतर सांगितले.
● तहसील कार्यालयाची सुरक्षा ऐरणीवर
पंचायत समिती कार्यालयाची सुरक्षा या निमित्ताने ऐरणीवर आला .कार्यालय ट्रेझरी ऑफिस आहे तेथे पोलीस गार्ड असतो शिवाय तहसील कार्यालयात व पंचायत समिती मध्ये रात्री पहारेकरी असतात या सर्वांच्य नजर चुकवीत त्या शेतकऱ्यांनी गळफास घेतला त्यामुळे या दोन्ही कार्यालयाची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
● पोलीस बंदोबस्त आला अन गेला ●
तहसील कार्यालयात गळफास घेऊन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली या घटनेची संपुर्ण जिल्ह्यासह राज्यात खबर गेली.काही उत्साही कार्यकर्त्यांनी मंत्री बच्चु कडू याना कळविले तर दुसरीकडे सोशल मीडियावर सरकार व प्रशासन विरोधात प्रतिक्रिया उमटल्या.जमाव व तणाव वाढेल म्हणून माळाकोळी, कंधार येथील अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच दंगल विरोधी पथक लोह्यात बंदोबस्ता साठी आले होते पण प्रकरण पोलीस निरीक्षक तांबे व सहकाऱ्यांनी व्यवस्थित हाताळले व नातेवाईकांच्या ताब्यात प्रेत देण्यात आले त्यामुळे बंदोबस्त ची गरज पडली नाही.तो आला आणि गेला .