हिमायतनगर,अनिल नाईक| नांदेड जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना सौरऊर्जेचे सेट बसून, कायमस्वरूपी नळयोजनेत येणारी अडचण दूर करावी. अशी मागणी सरसम माजी जी.हा परिषद सदस्य सौ.रंगुबाई सत्यव्रत ढोले यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या नळ योजना केवळ वीजपुरवठा खंडित होणे आणि ग्रामपंचायतीची देयके वसुली करण्यात येणाऱ्या अडचणीमुळे गावकर्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. या समस्येपासून सुटका मिळावी म्हणून लातूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत सौर उर्जा लाईटची सोय करून देणे गरजेचे आहे. कारण मागील २ वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना काळामुळे लाईट खात्याकडून चालू असलेले लाईट लोडसेटिंग आणि सक्तीच्या वसुलीमुळे तसेच डीपी खराब होणे किंवा वादळी वाऱ्याने पोल पडणे अशा अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे विहिरीला पाणी असून, अनेक गावांना पाणी पिण्यासाठी मिळत नाही.
गावातील जनतेला पाणी पाणी मिळत नसल्याने पाणीपट्टी देण्यास नकार दिला जात आहे. आणि ग्रामपंचायतकडे मोटर पंप दुरुस्तीसाठी, लाईट बिल भरण्यासाठी, नोकरांचा पगार करण्यासाठी पैसे राहत नाहीत. परिणामी पंधरा-पंधरा दिवस गावातील लोकांना पाणी मिळत नाही. अशा अनेक अडचणी दूर करण्यासाठी शासनाने सौर ऊर्जेचे साहित्य प्रत्येक ग्रामपंचायतीत बसविणे अत्यंत आवश्यक आहे. हि बाब हेरून शासनाने याकडे लक्ष घालून सर्व ग्रामपंचायतीला सौरऊर्जेचे सेट बसून दिलासा द्यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रंगुबाई सत्यवती ढोले यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी अशोकराव चव्हाण पालकमंत्री नांदेड, खासदार हेमंत पाटील, आमदार माधवराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर तसेच उपाध्यक्ष पद्मा रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडे दिले आहे.