नांदेड| कोरोना मुळे मृत्यु पावलेल्या पोलीस अंमलदार किरण तेलंगे, यांच्या कुटूंबीयाना सानुगृह आनुदान म्हणून साठ लाखाचा धनादेश पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, यांचे हस्ते देण्यात आला आहे.
कोरोना कालावधीत पोस्टे मुदखेड येथे कर्तव्यावर असतांना पोहे/2208 किरण ईरबाजी तेलंगे, यांनी कोरोना काळात आपले कर्तव्य सक्षमपणे निभावले कर्तव्यावर असतांना कोरोना संसर्ग झाले होते. ते कोव्हीड-19 विषाणुच्या संसर्गजन्य रोगाची लागण होऊन ते दिनांक 20.12.2020 रोजी मयत झाले. अशा प्रकारे ते कोरोना योध्दे ठरले होते. त्यावरुन पोलीस अधीक्षक कार्यालया मार्फत मा. पोलीस महासंचालक म. रा. मुंबई यांना सविस्तर अहवाल पाठविण्यात आला होता.
पोहे/2208 किरण ईरबाजी तेलंगे, पोस्टे मुदखेड यांचा कोव्हीड-19 विषाणुच्या संसर्गजन्य रोगाची लागण होऊन मृत्यु पावल्याने त्यांच्या कुटूंबियांना/कायदेशिर वारसदार यांना खालील प्रमाणे विशेष अर्थ सहाय्य व कोव्हीड-19 नुकसान भरपाई सानुग्रह अनुदान मंजुर झाले होते. सदरचे अनुदान एकुण 60,00,000/-(अक्षरी रुपये साठ लाख फक्त) पोहे/2208 किरण ईरबाजी तेलंगे, पोस्टे मुदखेड यांचे कायदेशिर वारसदार 1)श्रीमती मनिषा भ्र. किरण तेलंगे (पत्नी) यांना 20,00,000/-रुपये, 2)ऋतुप्रभात किरण तेलंगे(मुलगा), यांना 20,00,000/-रुपये, 3)कृष्णकांत किरण तेलंगे (मुलगा) यांना 20,00,000/-रुपये स्टेट बँक ऑफ इंडीयाचे नावाचा एकुण 60,00,000/-रुपयाचा चेक पोह/किरण तेलंगे यांचे कुटूंबीयांना पोलीस अधीक्षक मा. श्री प्रमोदकुमार शेवाळे, साहेब, यांचे हस्ते देण्यात आला. पोलीस हवालदार किरण तेलंगे हे मागील कांही वर्षा पासुन व कोरोना काळात पोस्टे मुदखेड येथे नेमणुकीस होते.
कोरोना काळात त्यंानी सतत त्यांचे बिट मध्ये कर्तव्यावर होते. त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय धाडसांनी त्यांनी त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावले, अशा कोराना योध्याच्या कुटूंबीयांना शासनाकडुन प्राप्त झालेल्या निधीचा चेक देवुन सन्मान केला. त्यांनी एकुण 26 वर्षे अविरत सेवा बजावली आहे. आतापर्यंत त्यांनी विवीध पोस्टेला सेवा बजावलेली आहे. दिवंगत हवालदार तेलंगे, यांचे कुटूंबीयाची आस्थेवाईक पणे विचारपुस करुन अडी अडचणीला मदत करण्याचे अभिवचन दिले. या प्रसंगी सपोनि श्री शिवप्रकाश मुळे, पोलीस कल्याण, सपोनि श्री शिवाजी लष्करे,जनसंपर्क अधिकारी व श्री चौधरी, कनिष्ट लिपीक पोलीस कल्याण यांनी सुध्दा कृतज्ञता व्यक्त केली आहे.