आ. बालाजी कल्याणकर यांच्यासह पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी केली पाहणी
नांदेड, अनिल मादसवार। हसापुर व खुरगाव पाटीवर लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सुरक्षेसाठी या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. आ. बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून या दोन्ही पोलीस चौक्यांना तत्वतः मान्यता मिळाली असुन सोमवारपासून दोन्ही पोलिस चौक्या कार्यान्वित झाल्या आहेत. याची पाहणी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर तसेच पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी केली आहे.
सुगाव रस्त्यावर अनेक वर्षापासून नागरिकांना लुटण्याच्या घटना घडत होत्या. तसेच खुरगाव पाटीवर देखील सायंकाळच्या सुमारास जाणाऱ्या वाहनधारकांना, शेतकऱ्यांना आडवून लुटले जात होते. या घटनांनी परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांनी आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे दोन्ही ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्याबाबत मागणी केली होती. आ. बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख तसेच गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पोलीस चौक्या उभारण्याबाबत मागणी केली होती.
गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी या पोलीस चौक्यांबाबत नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे व आ. बालाजी कल्याणकर यांची संयुक्तरित्या बैठक घेऊन या दोन्ही पोलीस चौक्यांना तत्वतः मान्यता दिली. सोमवारपासून या दोन्ही ठिकाणच्या पोलीस चौक्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. याची पाहणी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर व पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळंके, अर्धापूरचे पोलीस निरीक्षक जाधव तसेच लिंमगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लेवाड हे उपस्थित होते.
तसेच हसापुर येथे सरपंच देविदास सरोदे, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, नवनाथ काकडे, सतोष भारसावडे, गणेश बोकारे, धनंजय पावडे, दिपक भोसले तसेच खुरगाव पाटी येथे पंचायत समिती सदस्य सुखदेव जाधव, खूरगावचे सरपंच प्रितिनीधी गजानन लेडाळे, गोविदं कल्याणकर, बाबाराव लेंडाळे, माधव पटणे, सतोष जाधव, रामा धोंगडे, नागेश जनकवाडे, लक्ष्मण लेंडाळे, राजु जाधव, पुरभाजी जाधव, गजानन पटणे यांच्यासह आदीजण उपस्थित होते.
