नांदेड। महानगरपालिक , प्रज्ञा जागृति मिशन आणि यादव महासभा यांच्या संयुक्त विद्यमानाने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रजा मि चे संस्थापक अध्यक्ष स्व . भानुदासजी परशुराम यादव यांच्या प्रथम पुण्यतिथि औचित्य साधुन दि. २८ जुलै २०२१ रोजी सकाळी : १० पासुन ' यदुकुल ' यादव अहीर मंडल , स्व . बालराम यादव नगर, हनुमान पेठ , नांदेड येथे १८ वर्षावरील सर्वाना मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( पहीला आणि दूसरा डोज ) कैम्पचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड महानगरपालीकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त ॲङ अजितपाल संधु याच्या पुढाकाराने शहरातील जास्तीत जास्त नागरीकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे या धोरणा अंतर्गतच सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी आपणास कोणत्याही पुर्व नोंदणीची आवश्यता नसेल फक्त आधारकार्ड सोबत ठेवावा लागेल . नांदेड जिल्हातील ओबीसी नेते म्हणुन सर्वदुर परिचीत असलेले स्व . भानुदासजी परशुराम यादव यांचे मागच्या वर्षी कोरोना आजारामुळे निधन झाले होते , सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या यादव यांचे पुण्यस्मरण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने केले तरच त्यांना खरी श्रधांजली मानली जाईल असा मानस मुंबई महानगर न्यायाधिश , गजानन यादव आणि बिशन यादव , राष्ट्रीय महासचिव यादव महासभा , दिल्ली यांनी व्यक्त केला होता , किशोर यादव , धिरज यादव , गगन यादव , पवन गुरखुदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कॅम्प आयोजित केला जात आहे.
तरी जास्तीत जास्त नागरीकांनी याचा लाभ द्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ . ( प्रा . ) कैलाश यादव , भारत यादव , राज यादव , गोकुल यादव , दिपक यादव , सुशांत यादव आदिंनी केले आहे . सदर लसीकरण कार्यक्रम हा मनपाच्या तज्ञ टिम व्दारे पार पाडले जाईल आणि वैद्यकिय मार्गदर्शना करिता डॉ . संतोष यादव आणि डॉ.किरण यादव हे पूर्णवेळ सदर कार्यक्रमात उपलब्ध असतील.
