नांदेड| नांदेड जिल्ह्यात व ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाणे हद्दीतून सार्वजनिक ठिकाणी व आठवडी बाजारात मोबाईल गहाळ होण्याच्या व चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहे. असे असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीच्या गहाळ झालेल्या अंदाजे ८ लक्ष रुप्याचे मोबाईल हैण्डसेट शोधले आहेत.
हरवलेले मोबाईलचा शोधण्याची मोहीम पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी उघडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना यासंबंधीच्या सूचना दिल्या. यावरुन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शहरात तैनात केले होते. दरम्यान पथकाने शोध घेतला असता वजिराबाद हद्दीतील अठरा, शिवाजीनगर आठ, भाग्यनगर नऊ, विमानतळ पाच, नांदेड ग्रामीणमध्ये सहा, कंधार व देगलुर प्रत्येकी एक असे एकूण ५१ मोबाईल अंदाजे किंमत ०८ लक्ष एक हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरुन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, हवालदार शेख चाँद, गंगाधर कदम, सखाराम नवघरे, संजय केंद्रे, दसरथ जांभळीकर, विश्वनाथ इंगळे, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, बजरंग बोडके, गणेश धुमाळ, विलास कदम, राजू सिटीकर, ओढणे यांनी पार पडली असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकार म्हंटले आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून, ग्रामदिन भागातील पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला जाणाऱ्या मोबाईल चोरांना बेड्या ठोकून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.