नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या “उर्दू घर” इमारतीचे 14 जुलै रोजी उद्घाटन - NNL


नांदेड| 
नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या "उर्दू घर" इमारतीचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते बुधवार 14 जुलै 2021 रोजी होणार आहे. उर्दू घर मदिना तुल उलूम शाळेजवळ, देगलूर नाका नांदेड येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफकौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक हे असतील.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकरखासदार हेमंत पाटीलखासदार प्रताप पाटील चिखलीकरखासदार सुधाकर श्रृंगारे यांची उपस्थिती राहील. याचबरोबर विधान परिषद सदस्य आमदार सतीश चव्हाणआमदार विक्रम काळेआमदार अमरनाथ राजूरकरआमदार राम पाटील रातोळीकरआमदार मोहनराव हंबर्डेभिमराव केरामआमदार माधवराव पाटील-जवळगावकरआमदार डॉ. तुषार राठोडआमदार श्यामसुंदर शिंदेआमदार बालाजी कल्याणकरआमदार राजेश पवार, महापौर सौ. मोहिनी येवनकर, अल्पसंख्यांक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह विविध मान्यवरऊर्दू साहित्यिकऊर्दू प्रेमी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता या उद्घाटन सोहळ्यास निमंत्रीतांनाच प्रवेश राहिल.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी