हिमायतनगर नगरपंचायतीच्या मालमत्ता क्रमांक ३१७ मधील वीहिर बुजविणाऱ्यावर कार्यवाही करा - मराठा साम्राज्य संघ -NNL


हिमायतनगर,अनिल नाईक|
शहरातील वार्ड क्रमांक ९ मधील मालमत्ता क्रमांक ३१७ मधे असलेली वीहिर बुजवून पक्के बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकाराकडे जातीने लक्ष देऊन चौकशी करून संबंधितांवर आणि नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे मराठा समाजाच्या संघाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्याकडे करण्यात आली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिलेल्या निवेदनानुसार हिमायतनगर नगरपंचायतीच्या हद्दीत तत्कालीन ग्रामपंचायत असताना शहरातील नेहरूनगर येथील वार्ड क्रमांक ९ मधील मालमत्ता क्रमांक ३१७ मधील क्षेत्रफळ २० बाय २० विहीर होती. या विहिरीचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी व सांडपाण्यासाठी करण्यात येत होता. मात्र नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर त्या विहिरीला बुजवून त्या ठिकाणी पक्के बांधकाम करण्यात आकेले आहे. संबंधितानी नगरपंचायत मधील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हि सार्वजनिक विहिरींची जागा हडप करण्याचा प्रकार चालविला आहे. याबाबत अनेकांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा नगरपंचायतच्या कोणत्याही मुख्याअधिकारी यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून देवाणघेवाण करून प्रकरण जैसे थे ठेवले आहे. 


त्यामुळे या सार्वजनिक विहिरीला बुजवून त्या जागेवर अवैधरित्या बांधकाम करण्यात आले, हे बांधकाम तात्काळ थांबून त्या बुजवलेल्या विहिरीचे खोदकाम करून वार्ड क्रमांक ९ मधील जनतेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा. आणि या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांना निवेदन देऊन केली आहे. या प्रकरणात शासकीय मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करत असताना देखील संबंधित मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांचीही चौकशी करण्यात यावी आणि या जागेवर अतिक्रमण तात्काळ थांबून बुजलेल्या विहिरीचे खोदकाम करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. यामध्ये मुख्याधिकारी, नगरपंचायती अधिकारी, कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर मराठा समाजाच्या संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबाराजे गणपतराव देशमुख, हिमायतनगर तालुका अध्यक्ष माधव किसन शिंदे, लक्ष्मण डांगे आणि इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी