दिव्यांग बांधवाचा थाळीनाद आंदोलन ग्रामपंचायत कार्यालय केरूरत येथे संपन्न -NNL

कुंभकर्ण शासन प्रशासनास आंदोलन दिसत नाहीत का? बालाजी होनपारखे



नांदेड| जिल्ह्यातील दिव्यांगानी आपल्या हक्कासाठी दि २८जुन ते ९  जुलै २१ पर्यंत  पासुन सुरू केलेले चार दिवसांपासून शासन प्रशासनास लोकप्रतिनिधी यांना दिसत नाहीत काय?  असा संतप्त सूर दिव्यांग बांधवातून ऐकावयास मिळत आहे .

 

दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड  जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी आज चौथ्या दिवशी  जिल्ह्यातील १०० गावात थालीनांद आंदोलन करण्यात आले. त्यात 1 जुलै २०२१ रोजी बिलोरी तालुक्यातील  क्ग्रामपंचायत कार्यालय केरूर येथे अनेक दिव्यांगानी थालीनांद आंदोलनात घोषणेने थालीनांद करून परिसर दणाणून टाकले  निवेदन स्वीकारण्यासाठी  सरपंच,ऊपसरपंच निवेदन स्विकारून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


रामतिर्थ पोलिस बंदोबस्त दिला

खालील मागण्या संदर्भात दिव्यांगानी  घोषणेने थालीनांद करून आपला संताप व्यक्त  केला 

1)  दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगा ना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी 

2) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन अंमलबजावणी करणे 

3) पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी

4) ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून 2016 ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा. 

5) दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावी. 

6) दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा 200 फुट जागा त्वरीत देण्यात यावी 

7) दिव्यांग कायदा 2016 कलम 92 ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाईमुळे करावी.



आपल्या हक्कासाठी कुंभकर्ण प्रशासन जागे करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय समोर थालीनांद आंदोलन करूण दिव्यांग बांधवांनी आपला संताप व्यक्त केला. थाळीनाद आंदोलनात  दिव्यांग वृध्द निराधार मिञमंडळ महाराष्ट्र ता. बिलोली तालुक्यातील केरूर येथे बालाजी होनपारखे,बु श्रीरामे, बाबु शेख, सिधार्थ नरवाडे, अनुराधा, हाजुमिया शेख,ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,सदस्य यांनी  दिव्यांग बांधवांना आश्वासन दिले दिव्यांची आंदोलन यशस्वी केले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी