एल सी बी च्या पथकांने अखेर टाकली धाड
अर्धापुर, निळकंठ मदने| गेल्या सहा महिन्यापासून तालुक्यात चालणाऱ्या मोठ्या जुगार अड्यावर लेनदेन बिघडल्याने एल सी बी ने अखेर बुधवारच्या रात्री उशिरा धाड टाकून तब्बल १० अटल जुगाऱ्यांना अटक केली असून,३७हजाराची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.
अर्धापुर तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासून वेगवेगळी जागा बदलून मोठा जुगार वरिष्ठांच्या आर्शीवादाने चालत होता,याविषयी वृतमानपत्रात बातम्या प्रकाशीत झाल्या होत्या, पण वरिष्ठांनी एन ओ सी दिल्याने ठराविक मंडळींना हाताशी धरुन बामणी - दाभड शिवारात मोठा जुगार अड्डा चालत होता,येथे दुरवरुन जुगारी जुगार खेळण्यासाठी येत होते.
वरिष्ठांचा नेहमी येथे वरदहस्त राहतो,आर्थिक तडजोडीत बिनसले की एखादी कारवाई होते,पुन्हा जैसे थे कार्यक्रम असतो. यापूर्वी कामठा परीसरात मटका चालत होता,आता निमगाव येथे मटका खुलेआम सुरु आहे. गुरुवारी रात्री उशिरा एल सी बी ने दाभड- बामणी रस्त्यावर असलेल्या संतोष पुरभाजी टेकाळे यांच्या शेतातील आखाड्यावर टाकलेल्या धाडीत रविंद्रसींग मोहनसींग गाडीवाले, रामकृष्ण हरीहरराव लोखंडे,रमेश आर्जुन रणवीर, लक्ष्मण दतराव शिंदे,संजय माधवराव माहुरकर सर्व रा.नांदेड.
चंपत मुनेश्र्वर (तामसा), वसंत बळीराम टेकाळे, राजू माणिकराव टेकाळे, संतोष पुरभाजी टेकाळे, सर्व रा.दाभड, यांच्यावर आशीष सीताराम बोराटे यांच्या फिर्यादीवरुन अर्धापुर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून,यावेळी मुदेमाल ३७१३० रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा जुगार अड्डा चालविण्यासाठी कोण मदतगार होते याविषयी तालुक्यात चर्चेला उधाण आले असून, याप्रकरणी पुढील तपास सपोनि कपील आगलावे व साईनाथ सुरवसे हे करीत आहेत.