शिव भोजन थाळी उपक्रमातून गोरगरीब नागरिकांना मोफत जेवणाची सोय - मा.आ.बेटमोगरेकर -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी शिव भोजन थाळी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून गोरगरीब नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुखेड कंधार विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केली आहे. 

मुखेड शहरातील बसस्थानका शेजारी शिव भोजन थाळी गुरुवार दि. 10 रोजी सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मुखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, नायब तहसीलदार पदमवार आदीसह अनेक जण उपस्थित होते. माजी आमदार बेटमोगरेकर यांनी सांगितले की राज्य शासनाने गोरगरीब नागरिकासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शिव भोजन थाली च्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम आहे. 

गोरगरीब नागरिकांना मोफत तांदूळ व गहू वाटप केले जात आहे. राज्य शासनाच्या विविध योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार बेटमोगरेकर यांनी केले आहे.  या कार्यक्रमास जि प सदस्य प्रतिनिधी संतोष बोनलेवाड, सदाशिव पाटील, दीपक लोहबंदे, नगरसेवक विनोद आडेपवार, डॉ. रामराव श्रीरामे, तलाठी बालाजी बोरसुरे, वैद्य, अतुल देबडवार, डॉ. उमेश पाटील, शंकर पोद्दार, फौजदार मगरे साहेब, देवीचरणसिंह चौव्हाण, सचिन गुद्दे, विशाल गायकवाड, जयप्रकाश कानगुले, रामेश्वर इंगोले, शिवा आलेवार, मथुराबाई पुठ्ठेवाड, खाज्या धुंदी, कैलास मादसवार आदीसह अनेक जण उपस्थित होते. मुखेड येथील चौव्हाण परिवाराच्या वतीने श्री धनराज सिंह चौव्हाण यांनी शिव भोजन थाली उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आहे. अरुणसिंह चौव्हाण, प्रतापसिंह  चौहाण, संजयसिंह चौव्हाण, चंद्रप्रकाशसिंह चौव्हाण, युवराजसिंह चौव्हाण, सतीषसिंह  चौव्हाण, स्वप्नील चौव्हाण, पृथ्वीराजसिंह चौहाण, संजय बनसोडे, दिलीप हुडके यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. सतीश चौव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आहे.a

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी