मुखेड,रणजित जामखेडकर| तालुक्यातील मौजे जांब (बु.) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा उप-बाजार असणाऱ्या जांब (बु) येथे प्लॉट वाटपातील भ्रष्टाचार प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश देऊनही अध्याप दोषी विरुद्ध कोणतीही कारवाई मुखेड पोलिसांनी केली नाही. या प्रकरणात पोलिसांकडून भ्रष्टाचार करणाऱ्या पाठराखन केली जात असून दोषींविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जि.प.चे माजी सदस्य बालाजी बंडे यांनी पोलिस निरीक्षकाकडे केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचा उप-बाजार असणाऱ्या जांब (बु) येथील प्लॉट चे बेकायदेशीररित्या वाटप झाल्या बाबत बंडे यांनी १० डिसेंबर २०१९ रोजी पोलीस निरीक्षकांना एक तक्रार दिली होती. बंडे यांच पत्रानंतर पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुखेड येथील पोलिस निरीक्षकांना दिले होते. येथील पोलिस निरीक्षकांनी बंडे यांच्या अर्जांच्या अनुषण गाणे सखोल चौकशी केली असता तत्कालीन सभापती, उपसभापती, विद्यमान सभापती, उपसभापति, सचिव यांनी शासनाची व बाजार समितीची फसवणूक केल्याची बाब निष्पन्न झाली असून कर प्लॉटचे मुल्याकन कमी करून शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडवला आहे. तसेच बेकायदेशीररित्या प्लॉट, गाळे वाटप केल्याची बाब ही समोर आली आहे.
जांब येथील प्लॉट वाटपातील भ्रष्टाचाराबाबत मुखेड येथील पोलीस निरीक्षकांनी २० नोव्हेंबर २०२० रोजी सहा पानांचा सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षक आकडे सादर केला आहे. या अहवालाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी १० मे २०२१ शासनाची व कृषी उत्पन्न बाजार समितीचे फसवणूक करीत करणार्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलिस अधीक्षकांनी आदेश देऊनही दोषी विरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. या प्रकरणात हाता अडकलेला लोकांकडून आपल्यासह कुटुंबीयांच्या जीवितास धोका असून तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी बाग नेमणूक बंडे यांनी मंगळवार दि.१५ रोजी पोलीस निरीक्षकाकडे केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई न केल्यास पोलीस निरीक्षणका विरुद्ध वरिष्ठांकडे दाद मागण्यात येईल, असेही बंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन व विद्यमान सभापती, उपसभापती, सचिवांचे हात जांब बु येथील प्लॉट वाटपातील भ्रष्टाचारात गुंतले असल्याची पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या अहवालात समोर आले असून माजी जि.प. सदस्य बालाजी बंडे यांनी हे प्रकरण उजेडात आणले आहे, या प्रकरणातील दोषी कडून आपल्या कुटुंबियांस धोका असल्याचे बंडे यांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कार्यवाही करण्याचे पोलीस अधीक्षकांचे सुस्पष्ट आदेश असतानाही मुख्य पोलिसाकडून या प्रकरणातील दोषी यांची पाठराखण केली जात आहे.