खतांची दरवाढ रोखली तरच शेतकरी जगेल- खासदार हेमंत पाटील - NNL

दरवाढ मागे घेण्याची केली पंतप्रधानाकडे मागणी



हिंगोली/नांदेड| खरीप पेरणीचा  हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना  केंद्र सरकारने रासायनिक खतांची  केली  आहे .ही केलेली दरवाढ रोखली तरच या देशातील शेतकरी जगेल अन्यथा कोरोनाच्या आणि आर्थिक मंदीच्या लाटेत या देशातील शेतकरी आर्थिक ओझ्याने भरडून निघेल  त्यामुळे केंद्राने केलेली ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडे केली आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ने खतांच्या किंमतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत दरवाढ केल्यामुळे  देशातील शेतकऱ्यांला आर्थिक संकटाचा  सामना करावा लागत आहे .सदैव शेतकरी प्रश्नावर आपली भूमिका ठामपणे मांडणारे खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी सुद्धा शेतकरी हित लक्षात घेऊन खतांच्या दरवाढी विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.ते म्हणाले की, खरीप पिकाची पेरणी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना केंद्र सरकारने केलेली खतांची दरवाढ अत्यंत अन्यायकारक आहे.याबाबत सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत असून या दरवाढीचा गांभीर्यने दखल घेऊन तातडीने दरवाढ मागे घ्यावी.सध्या  प्रत्येक ५० किलो खतांच्या पोत्यामागे १००० ते २००० रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे,

यामध्ये डीएपी पूर्वी किंमत - १२०० आता वाढीव १९०० रु.पोटॅश पूर्वी किंमत ८५० आता वाढीव  १००० रु.तर १०:२६:२६ पूर्वी किंमत ११७५ आता वाढीव १७७५रु. १२: ३६ पूर्वी किंमत ११८५ आता वाढीव किंमत १८०० रु तर १६:१६:१६ ची पूर्वीची  किंमत ११७५ आणि आताची वाढीव किंमत १४०० रुपये करण्यात आली आहे .सर्व खतामध्ये एकूण ५५ टक्के दरवाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना या चार खतांसाठी १० हजार पर्यंत किंमत मोजावी लागत आहे.त्यामुळे ही  करण्यात आलेली दरवाढ देशातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या खाईत नेऊन टाकणारी आहे .

आधीच कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे शेतमालाचे भाव गडगडले असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यात ऐन  खरीप पिकाच्या पेरणीच्या तोंडावर खताची  दरवाढ करणे म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचा प्रकार आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकून सहानुभूती दाखवायची आणि दुसरीकडे अश्या मार्गाने भरपाई करून घ्यायची  अश्या प्रकारचे अन्यायकारक आणि दुटप्पी धोरण केंद्र सरकार राबवत असल्याचा  घणाघाती आरोप  खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. कोरोनाच्या आजाराच्या काळात आर्थिक मंदीची लाट सुरू असताना देशातील हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश आणि असंतोष देशाच्या पंतप्रधानांनी ऐकला पाहिजे तरच या देशातील शेतकरी जगेल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.यावेळी त्यांच्या समवेत आ.संतोष बांगर,आ.बालाजी कल्याणकर,जिल्हा परिषद सदस्य भानुदास जाधव, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, उद्धव गायकवाड, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक राम कदम, दिनकर गंगावणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी