खत, पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करून किंमती कमी करा - हरिहरराव भोसीकर
नांदेड| केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे या खत दरवाढीच्या विरोधात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून सदर दरवाढीच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
येत्या काही दिवसात खरीप पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू होईल. या पेरणीकरता बी-बियाणे सोबत खत हा प्रमुख घटक असआहे. मात्र केंद्र सरकारने खतांच्या किमंतीमध्ये प्रतिगोणी 600 ते 700 रुपये एवढी वाढ केली आहे. यामध्ये१०:२६:२६ या खताचा दर 1175 रुपये एवढा होता परंतु आता याची किंमत1775 रुपये एवढी झाली आहे. डीएपी या खताची किंमत1185 रुपये एवढी होती. आता हीच किंमत1900 रुपये एवढी झाली आहे. अतिवृष्टी, कोरोनामुळे लॉकडाऊन, पिकांचे घटलेले सरासरी उत्पन्न, शेतमालाला योग्य भाव न मिळणे यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यामध्ये ही खताची केलेली दरवाढ शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. अशातच अनेक शेतकऱ्यांनी पैशाअभावी बी-बियाणे ,खतांची खरेदी अजून केलेली नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही खतदारवाढ रद्द करून पूर्वीचेच दर कायम ठेवावेत अशी मागणी करण्यात आली.
तसेच केंद्र सरकार दररोज पेट्रोल व डिझेल चे भाव वाढवून आता चक्क शंभरी पार करून पेट्रोल 100 रु.प्रति लिटर एवढे झाले आहे. या पेट्रोल, डिझेल दरवाढी मुळे वाहतूकचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम म्हणून बाजारातील वस्तूंचे भाव वाढत आहे त्या महागाईचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक जण आपले रोजगार, व्यवसाय गमावून बसले आहेत. त्यात ही पेट्रोल, डिझेल ची दरवाढ झाल्यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. याकरिता जनतेच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत निवेदन पाठवून खतांची व पेट्रोल, डिझेल ची दरवाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल चे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, जेष्ठ नेते मोहन पाटील टाकळीकर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या कल्पनाताई डोंगळीकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डी. बी. जांभरूणकर,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष बालाजी पाटील शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नांदेड तालुकाध्यक्ष उत्तमराव पा. आलेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस धर्माबाद चे रवींद्र शेट्टी, हणमंत पा.जगदंबे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धर्माबाद तालुकाध्यक्ष नागेंद्र प.चोळाखेकर, राष्ट्रवादी काँग्रेस हिमायतनगर तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी,राष्ट्रवादी पदवीधर कॉंग्रेसचे जिल्हाध्य सचिन देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अर्धापुर शहराध्यक्ष संदीप राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हासरचिटणीस रेखाताई राहिरे, प्रा. मझरुद्दीन सर,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष मधुकर पाटील पिंपळगावकर,विठ्ठल पा. नांदूसेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.