हिमायतनगरात रुग्णाची संख्या ८० च्या पार; तहसीलदार उतरले रस्त्यावर
हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या लाटेमध्ये रग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून, आजच्या सकाळच्या स्थितीमध्ये रूग्णसंख्या ८० च्या वर गेली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कार्यवाहीचा सामना करावा लागेल असा इशारा शनिवार रोजी तहसीलदार डी.एन गायकवाड यांनी थेट रस्त्यावर उतरून नागरिकांना सूचना दिल्या आहेत. तसेच ४० ते ५० लोकांवर दंडात्मक कार्यवाही करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याने कोरोनाला रोकण्यासाठी नागरिकही सहकार्य करत असल्याचे दिसून आले आहे.
सुरुवातीला कोरोनाच्या १ रुग्णसंख्येवरुन वाढत वाढत रूग्णसंख्या ३७ झाली होती. त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी कडक निर्बंध लावले मात्र नागरिक नियमांचे पालन करत नाहीत, त्यामुळे शहरात मास्क, सैनिटायजर, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांची संख्या गर्दीच्या ठिकाणी वाढली आहे. त्यामुळे शहरामध्ये कोरोनाने उग्र रूप धारण केले असून, शुक्रवारी रात्रीपर्यंत ८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली आहे. एकीकडे शहरात दुकाने सायंकाळी ५ नंतर बंद ठेवण्याचे आदेश असताना अनेक जण बंदच्या आदेश नंतरही रात्री उशिरापर्यंत आपली प्रतिष्ठाने चालू ठेवत असल्याचा विपरीत परिणाम रुग्ण संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. तर ज्यांनी कोरोना टेस्ट दिली त्यातील काहीजण टेस्ट रिपोर्ट येण्यापूर्वीच रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत आहे. काही भागात अख्ख कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत आहे ते घर तो भाग सील करण्याची गरज असल्याचे मत जागरुक नागरिकांनी व्यक्त केलं आहे .
हि परिस्थिती आणि वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने पळसपूर रस्त्यावरील आयटीआय येथे कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित झाले आहे. तसेच शनिवारी दुपारी तहसीलदार तथा मुख्याधिकारी डी.एन.गायकवाड हे थेट रस्त्यावर उतरले आणि शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ राउंड मारला. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या. तसेच मास्क, सैनिटायजर, सोशल डिस्टन्स न पळणाऱ्या जवळपास ४० ते ४५ लोकांना दंड लावला आहे. त्यामध्ये दुकानदार, दुचाकीवरून फिरणारे, विना मास्क फिरणारे यांच्याकडून २००, ५०० रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्या सूचनांचे सर्वानी पालन करावे, आठवडी बाजार भरणार नाही. नियमनाचे उल्लंघन करू नये अन्यथा आपत्ती व्यवस्थापन नियमांतर्गत कडक कार्यवाही केली जाईल असा इशाराही दिला आहे. यावेळी त्यांचे सोबत ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डी.डी.गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी संदेश पोहरे, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक बालाजी महाजन, तलाठी पुणेकर व नगरपंचायत, तहसील, आरोग्य, कर्मचारी, पत्रकार, उपस्थित होते.
वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता दररोज लाळेचे नमुना, चाचणी, आरटी-पीसीआर व अँटीजन चाचणी १०० हुन अधिक लोकांची केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असून, आत्तापर्यंत हा आकडा ८० च्यावर गेला असून, आजच्या तपासनीस १०० चा आकडा पार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काम नसताना बाहेर फिरू नये, नियमांचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ गायकवाड यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील कोरोना काळात कोविड केअर सेंटरची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या रोखण्यासाठी सर्वानी सहकार्य केले होते. त्यावेळी डॉक्टरांसह नगरपंचायत व रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य चोखपणे बजावले. पुन्हा कोरोनाच्या २ काळात हे कोविड सेंटर सुरू झाले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ गायकवाड यांनी व्यवस्थीपणे येथे यंत्रणा कार्यान्वित केली त्यासाठी ३०० खाटांची सोय करण्यात आली असून, रीगणास आवश्यकता भासल्यास ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली आहे. रुग्ण संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी जनजागृती केली जात असून, यासाठी नगरपंचायतीचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मुख्याधिकारी तथा तहसीलदार गायकवाड हे स्वतः आढावा घेत आवश्यक त्या सूचना देत असतात असे वैद्यकीय अधिष्ठाता डी.डी.गायकवाड यांनी सांगितले आहे. कोविड केयर सेंटर मध्ये वैदयकीय अधिकारी डॉ.उमरेकर, डॉ ज्ञानेश्वर कोलगाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ५ सिस्टर व तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर व त्यांचा स्टॉप कोरोना रुग्णाच्या सेवेत कार्यान्वित राहणार आहे.