जिल्हाधिकार्यांच्या कारवाईची कर्मचार्यांनाच धास्ती...

माफियांचा सावध पावित्रा, आंदोलनकर्त्याची  प्रकृती खालवली 

नांदेड| नदीकाठच्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी स्वतः भनगी, पिंपळगाव (नि) परिसरात माफियांविरोधात कारवाई केली. जिल्हाधिकारी डाॅ.  विपीन यांच्या अचानक कारवाईची धास्ती घेत सोमेश्वर, रहाटी, जैतापुर परिसरातील  माफियांना महसुल कर्मचार्यांनी सावधातेचा कानमंत्र दिला आहे. मंगळवारी एका आंदोलनकर्त्याची प्रकृती उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.


लाॅकडाउन  कालावधित  अवैद्य  रेती  उपसा  प्रकरणी  सोमेश्वर  शिवारात गोदावरी  काठावर मार्च (दि.१९) पासुन निसर्गप्रेमी आनंदा बोकारे, सदाशिव कौसे यांनी सत्याग्रह,  अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांच्या मागण्यांची  दखल घेऊन रविवारी (दि. २६) जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी स्वतः भनगी, पिंपळगाव (नि) येथील सक्शनपंप जप्त करत तराफे आगीच्या हवाली केले. अवैद्य रेतीसाठे जप्त करून पोलिस  पाटलांकडे ताबा पावत्य देत रेती माफियांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. भनगी, पिंपळगाव (नि ) येथील विष्णुपुरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील रेती माफियां विरोधातील कारवाईचा धसका घेत रहाटी, सोमेश्वर, जैतापुर, गंगबेट, बेटसांगवी, आंतेश्वर येथील महसुलच्या स्थानिक कर्मचार्यांनी माफियांना सावधानतेचा कानमंत्र दिल्याने सुत्रांच्या माहितीनुसार माफियांयांनी साधन सामग्री अज्ञातस्थळी दडवली आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्यांनी  अवैद्य रेती उपशाला लगाम लावण्यासाठी कारवाईची धडाका सुरू केल्याने माफियांसह त्यांच्या हितचिंतक अधिकारी, कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. माफियांशी अर्थ संबंध टिकुन, कारवाईच्या फटकार्यात कातडी वाचवण्यासाठी महसुलच्या स्थानिक हितचिंतक   कर्मचार्याने माफियांना सावधानतेचा कानमंत्र दिल्याची चर्चा रहाटी, सोमेश्वर परिसरात  सुरू आहे.

आंदोलनकर्त्यावर उपचार  मागण्यावर ठाम -आनंदा  बोकारे 
सोमेश्वर सरपंच पती सदाशिव कौसे यांचे (दी. १९) मार्च पासुन कार्यालयीन वेळेत आंदोलन  सुरू आहे. प्रकृती खालावल्याने मंगळवारी (दी. २८) सदाशिव कौसे यांच्यावर उपचार  करण्यात आले. 
x

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी