हिमायतनगरातील घरकुल धारकांना शेवटचा हप्ता लवकरात लवकर देण्यात यावा

हिमायतनगर | पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे फायनल चे बिल (अनुदान) मिळावे म्हणून वंचित घरकुलधारकांनी अनुदानाचा हप्ता मिळावा अशी मागणी केली निवेदन देऊन केली आहे.

हिमायतनगर शहरातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. आज पर्यंत शासनाकडून अनुदान स्वरूपात तीन हप्ते मिळाले आहेत. मंजूर घरकुलाचे काम पूर्णत्वास नेले आसता उर्वरित अनुदान देण्यास नगरपंचात प्रशासन चालढकल करत आहे. वारंवार विचारपूस केली आसता आज येईल उद्या येईल असे सांगून बोळवण केली जात आहे.

घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी आम्ही व्याजाने, उसनवारी रक्कम आणून घरकुल बांधले आहे. त्यानंतर कोरोनामुळे हाताला काम नाही त्यामुळे कर्जाऊ घेतलेली रक्कम परत करणे अवघड झाले आहे. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले आहे. यासर्व अडचणीतून बाहेर निघण्यासाठी तात्काळ घरकुलाचा उर्वरित अनुदानाची रक्कम (हप्ता) देण्यात यावा अशी मागणी हिमायतनगर शहरातील घरकुल धारकांनी केली आहे. यानिवेदनावर संतोष सांभाळकर, पंजाबराव चव्हाण, ओमप्रकाश सांभाळकर, सदानंद कदम, शिवाजी चव्हाण, कैलास चव्हाण, देवानंद कदम, धुर्पाताबाई पाळजकर, परमेश्वर शिंदे, मारोती चव्हाण, सटवाजी हेंद्रे, खंडू डुकरे, केशव कदम, आंबादास लडेवाड, परमेश्वर काळे, विनोद काळे, विनायक ढोणे, विलास वानखेडे, दिगंबर वानखेडे, शिवाजी माने, गोदावरी पवार, सविता शिंदे, आदींसह अनेक घरकुल धारकांच्या स्वाक्षऱया आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी