साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा

लहुजी शक्ती सेनेची शासनाला मागणी

हिमायतनगर| साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा म्हणून लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका यांची वतीने निवेदन देण्यात आले.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी निमित्त १ ऑगस्ट २०२०असुन आण्णाभाऊचे  समाजात तसेच साहित्यात उल्लेखनीय असे योगदान आहे. त्यांनी साहित्यातुन पिढीतांचे शोषितांच्या जिवनाची कथा चितारली तसे आपल्या कृती लेखणी व शाहिरीतुन वंचित समाजाच्या व्यथा वेदना मांडल्या. आशा थोर समाज सुधारकास भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा म्हणून लहुजी शक्तीसेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड, युवा अध्यक्ष विकास गाडेकर करंजीकर, ता.सहसचिव प्रशांत महाजन, युवा तालुका सचिव तानाजी गाडेकर, सामाजिक कार्यकर्ता, श्रिरंग गायकवाड, यांनी  नायब तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी