NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

बुधवार, 26 अगस्त 2015

भरदिवसा आखाड्यावर दरोडा...

पाण्याचा बहाणा करून अज्ञात चोरट्यांचा भरदिवसा आखाड्यावर दरोडा...हिमायतनगर(अनिल मादसवार) शहरातील उत्तरेकडील ७ कि.मी. अंतरावर असलेल्या एका आखाड्यावर अज्ञात चोरट्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करून महिलेचे तोंड दाबून मारहाण करून अंगातील दागिने लुटून नेल्याची खळबळजनक घटना दि.२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथील सदन शेतकरी संतोष गाजेवार यांच्या शहरापासून उत्तरेस ७ कि.मी.अंतरावर असलेल्या शेतात सालगडी म्हणून चांदु पुंजाराम अंबेकर हा पत्नी अंजनाबाई सोबत आखाड्यावर राहतो. बुधवार दि.२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास चांदु अंबेकर व अन्य एक मजूरदार रामराव कोंडीबा वणेकर हे दोघे शेतातील कापसावर पडलेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीचे काम करीत होते. तर सालगड्याची पत्नी सौ. अंजनाबाई ही आखाड्यावर जेवणाचा स्वयंपाक करीत होती. दरम्यान अंगावर काळे टीशर्ट असलेला एक २५ ते ३० वर्षवयोगटातील अज्ञात युवक आला. आणि गडीदादा कुठे गेले असे म्हणून त्याने पिण्यासाठी पाणी मागीतले. शेजारील कोणी मजूरदार असेल असे समजून अंजनाबाई हिने त्या युवकास पिण्याचे पाणी दिले. याच वेळी पाठीमागुन अन्य एका युवकाने येवून तोंड दाबून धरले. कोणीही नसल्याचे पाहून दोघांनी सदर महिलेच्या कानातील २ ग्रामचे कर्णफुले व गळ्यातील २ ग्रामचे सोन्याचे मणीमंगळसुत्र अंदाजे ८ हजाराची जबरीने काढून घेतले, यास विरोध करता महिलेस मारहाण करून चोरट्यांनी पलायन केले आहे. 

चोरटे पसार होताच सदर महिलेने आरडा - ओरडा केली असता फवारणी करणारे पती व अन्य एक मजूरदारांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत अज्ञात चोरटे पसार झाले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सदर महिला भयभीत झाली आहे. घटनेची वार्ता सर्वत्र पसरल्याने भीतीपोटी शेतीकामासाठी जाणाऱ्या महिलां कामावर येण्यास नकार देत आहेत. घटनेची माहिती मिळताच शिकावू उपविभागीय पोलिस अधिकारी एस.डी.बारी, पोलिस निरीक्षक अशोक चाटे, एएसआय डांगरे, सुरनर, पोहेको. आडे, वसंत जाधव, पोको. डगवाल यांनी घटनास्थळावर पोहंचून पंचनामा केला. याबाबत सौ. अंजनाबाई हिने दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञात दोन चोरट्याविरुद्ध हिमायतनगर पोलिस स्थानकात कलम ३९२, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस निरीक्षक अशोक चाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, हि घटना गंभीर असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने अज्ञात चोरट्यांच्या शोधात पोलिस पथक रवाना केले आहे. लवकरच त्या चोरट्यांना आम्ही जेरबंद करून महिला व तालुकावासियांच्या सुरक्षेची जिम्मेदारी पूर्णतः पार पाडू असे आश्वासन दिले.