कृषी अधिकारी कार्यालयात शुकशुकाट ..

फिल्डच्या नावावर अधिकारी कर्मचार्यांची दांडी 

हिमायतनगर(वार्ताहर)येथील तालुका कृषी कार्यालयाचा अनागोंदी कारभार वाढत चालाल असून, कार्यालयात नेमाहीच शुकशुकाट पसरत चालला असून, अधिकारी व कर्मचारी फिल्ड व मिटींगच्या नावाखाली सर्रास कार्यालयाला दांडी मारत असल्याचा आरोप खडकी बा.येथील सरपंच पांडुरंग गाडगे यांनी केला आहे.

शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार कृषी कार्यालयात खेटे घालून अधिकारी व कर्मचारी भेटत नसल्याने फिल्डवर व मिटींगच्या नावाखाली कार्यालयास सतत दांडी मारत आहेत. दि.०६ रोजी सकाळी ११ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात खुद्द तालुका कृषी अधिकारी श्री दावलबाजे, कृषी पर्यवेक्षक पवार, लखमोड, जाधव यांच्यासह कोनही उपस्थित झाले नव्हते. केवळ एक दोन कर्मचारी, सेविका, आणि कामानिमित्त आलेले नागरिक या ठिकाणी दिसून आले. विचारणा करून माहिती घेतली असता अधिकारी व अन्य कर्मचारी पैसेंजर रेल्वेने येत असल्याचे समजले. त्यामुळे शेतकर्यासाठी कार्य करणाऱ्या कृषी विभागातील अधिकारी शेतकर्यासाठी शासनच्या योजना राबविण्यात उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी संगनमताने केलेली हि लुट असल्याचेही ते म्हणाले. सदरील अधिकार्यास जाब विचारण्यासाठी प्रसंगी न्यायालयाचेही दार ठोठावणार असल्याचे त्यांनी नांदेड न्युज लाईव्हशी ओलताना सांगितले. कृषी विभागातील वाढत्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी पाहता वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून हिमायतनगर ताकुक्यात करण्यात आलेल्या साखळी बंधारे, कृषी वाचनालये, आणि शेतकर्यासाठी आलेल्या योजनाची खातेनिहाय चौकशी करावी आणि यातील दोषींवर शासन व जनतेची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिस कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी